गब्बरचा जब्बर धमाका, रोहित विराटला पछाडत रेकॉर्डब-ेक कामगिरी

यूएई

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 33 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीने हैदराबादचा 8 विकेटसने दणदणीत विजय मिळवला. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने हे विजयी आव्हान 2 विकेटसच्या मोबदल्यात 13 चेंडूआधी पूर्ण केलं.

दिल्लीकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद 47 धावा केल्या. तर कॅप्टन रिषभ पंतने नॉट आऊट 35 रन्स केल्या. या जोडीने दिल्लीला विजयापर्यंत पोहचवलं. दिल्लीचा या मोसमातील हा 7 वा विजय ठरला. दिल्लीने यासह पॉइंटसटेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.

दरम्यान या सामन्यात शिखर धवननेही 42 धावा कुटल्या. धवनने या खेळीसह अनोखा कारनामा केला. तसेच आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकलं.

गब्बरचा जब्बर धमाका

शिखरने आयपीएलमध्ये सलग 6 व्यांदा तर एकूण 8 वेळा 400 पेक्षा अधिक धावा करण्याचा कारनामा केला. धवनने याआधी अनुक्रमे 2016 पासून 2020 पर्यंत प्रत्येक मोसमात 400 पेक्षा अधिक धावांची नोंद केली आहे.

सलग सर्वाधिक वेळा 400 प्लस धावा करण्याबाबत चेन्नईचा सुरेश रैना आणि हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर आघाडीवर आहे. या दोघांनी सलग 7 वेळा 400 पेक्षा अधिक धावा करण्याचा कारनामा केला आहे. तर सर्वाधिक वेळा 400 प्लस धावा करण्याचा रेकॉर्ड रैनाच्या नावे आहे. रैनाने एकूण 9 वेळा 400 धावा केल्या आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!