’या’ व्यक्तीला विराट कोहली कर्णधारपदावर नको हवा होता; कारण…
दिल्ली
विराट कोहलीने टी -20 विश्वचषकानंतर क्रिकेटच्या कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. विराट कोहलीने सोशल मीडियाद्वारे टी-20 ही माहिती दिली होती. कोहलीच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्वत: कोहलीला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला असल्याचा खुलासा झाला आहे.
रवी शास्त्री यांनी कोहलीला फक्त टी -20 नाही तर वनडेच्या कॅप्टन्सबाबतही हाच सल्ला दिला होता. विराट कोहलीने कर्णधारपद सोडून आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं असल्याची माहिती आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकार्याने सांगितलं, ‘भारताने नियमित कर्णधाराशिवाय ऑॅस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकल्यानंतर कोहलीच्या कर्णधारपदाविषयी चर्चा सुरू झाली. आता हे देखील संकेत की कोहलीला 2023 च्या आधी वनडे कर्णधारपद सोडावं लागेल जर गोष्टी योजनेनुसार झाल्या नाहीत तर.‘
हे अधिकारी पुढे म्हणाले, फशास्त्री सुमारे सहा महिन्यांपूर्वी कोहलीशी बोलले होते. पण कोहलीने रवी शास्त्रींचं ऐकलं नाही. तो अजूनही एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे आणि म्हणूनच त्याने केवळ टी-20 मध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. कोहलीचा फलंदाज म्हणून कसा वापर केला जाऊ शकतो यावरही बोर्ड चर्चा करत होतं. कारण त्याच्याकडे खेळाडू म्हणून अजून बरेच काही शिल्लक आहे.‘
तर दुसरीकडे आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं कर्णधार पदंही विराट पुढील वर्षापासून सोडणार आहे. गेल्या 8 वर्षांपासून विराट आरसीबीच्या कर्णधारपदी विराजमान आहे. पण, आतापर्यंत तो या संघाला विजेतेपदी आणू शकलेला नाही. अशा वेळी त्याच्यावर असणारा दबाव सातत्यानं वाढत होता. याच कारणामुळे त्याने कर्णधारपदाचा त्याग केला असल्याचं म्हटलं जातंय.