इंग्लंडमध्ये न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

लंडन

न्यूझीलंड क्रिकेटच्या पावलांवर पाऊल ठेवत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने देखील आपला पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात दौर्‍याचा पहिला सामना खेळला जाणार होता, न्यूझीलंड क्रिकेटने त्याच दिवशी सुरक्षेचे कारण देत संपूर्ण दौरा रद्द केला होता. न्यूझीलंड आणि इंग्लंडचा पाकिस्तान दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केल्यानंतर आता आणखी एक आंतरराष्ट्रीय दौरा धोक्यात आल्याचे दिसत आहे. इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

आज इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ लीसेस्टर येथे तिसरा एकदिवसीय सामना खेळणार होता. त्यादरम्यान अशा धमक्या आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या वृत्ताला न्यूझीलंड क्रिकेटने दुजोरा दिला आहे. बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा एक मेल इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला आला आहे. ही धमकी किती गांभीर्याने घेतली जाईल, हे त्याच्या तपासानंतरच कळेल, पण धमकीनंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचे न्यूझीलंड क्रिकेटने म्हटले आहे.

इंग्लंडच्या संघाची सुरक्षा धमकीच्या ईमेलनंतर वाढवण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर खेळाडूंनी सरावही केला नाही. तसेच, सुरक्षा दलांना तपासासाठी पाचारण करण्यात आले. पण, क्रिकेट चाहत्यांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे की या धमक्यांनंतरही आजचा सामना दोन्ही संघांमध्ये होणार आहे. खबरदारी म्हणून संघांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

एकूण 5 एकदिवसीय सामने न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या महिला संघात होणार आहेत. दोन सामने झाले असून इंग्लंडचा संघ ज्यात 2-0 ने पुढे आहे. इंग्लंड संघाने बि-स्टल आणि वॉर्सेस्टर येथे खेळलेले सामने जिंकले. आजचा सामना लेसेस्टरमध्ये होईल. त्याचवेळी, चौथा सामना 23 सप्टेंबरला डर्बीमध्ये खेळला जाईल आणि पाचवा सामना 26 सप्टेंबरला कँटबरीमध्ये खेळला जाईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!