दिल्ली कॅपिटल्सच्या शिबीरात सहभागी होण्यासाठी चार महिने वाट पाहिली – पॉटिंग
दुबई,
आयपीएलचा संघ दिल्ली कॅपिटल्सच्या शिबीरामध्ये परत एकदा सहभागी होण्यासाठी मी चार महिन्यांची वाट पाहिली आहे असे मत संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंगने व्यक्त केले.
पॉटिंगने म्हटले की दिल्ली कॅपिटल्समध्ये माघारी येण्यासाठी चार महिने वाट पहावी लागली होती. ज्यावेळी मी संघा बरोबर काम करतो तर माझ्याकडे इतका चांगला वेळ असतो आणि हे माझ्या कॅलेंडर वर्षातील एक चांगला काळ असतो. येथे जे होत आहे त्यावर माझी बारीक नजर आहे. मी येथे कोचिंग स्टाफशी चर्चा करत आहे आणि त्यांनी आता पर्यंत (प्री-सीजन कँपमध्ये) चांगले काम केले आहे.
त्याने म्हटले की खेळांडूनी जी तीव-ता दाखवली आहे आणि त्यांच्या दृष्टिकोणालाही आपण पाहू शकतोत. हे वास्तवामध्ये आता पर्यंत एक सार्थक शिबीर राहिले आहे. पुढील चार पाच आठवडयात आम्हांला जे काही मिळणारे आहे त्याला पाहता वास्तवामध्ये उत्साहित आहे.
46 वर्षीय पॉटिंगच्या मते आयपीएल 2021 हंगामाच्या पहिल्या फेरीत संघाच्या प्रदर्शनाला काहीही महत्व राहत नाही आणि त्यांना परत एकदा सुरुवात करावी लागेल.
पॉटिंगने म्हटले की, आयपीएल हंगामाच्या पहिल्या फेरीत आम्ही काय केले आहे याचा कोणताही फरक पडत नाही. चांगले क्रिकेट खेळून वास्तवामध्ये आम्हांला चार महिने झाले आहेत. यामुळे आम्हांला परत एकदा सुरुवात करावी लागेल. स्पर्धेत पुढे जाण्यासाठी आम्हांला स्वत:ला निर्माण करावे लागेल आणि आम्ही स्पर्धेच्या शेवट पर्यंत आपले सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेळूत हे सुनिश्चित करावे लागेल.
स्पर्धेच्या पहिल्या हाफमध्ये आम्ही किंती चांगले खेळलोत आणि किती मेहनत की या कारणावर आमचे प्रदर्शन राहिले होते. परंतु आम्ही आपले सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेळलो नाहीत असे मला वाटते.
खाद्यांला झालेली जखम आणि त्यांवरील शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर श्रेय अय्यरच्या पुनर्गमना बाबत विचारले असता पॉटिंगने म्हटले की श्रेयसचे माघारी येणे खूप चांगले आहे. मी त्यांच्याशी खूप वेळा बोलणे केले आहे आणि त्यांची ट्रेनिंग खूप चांगले राहिले आहे. तो मैदानावर माघारी आल्याने धावा करणे आणि विजय मिळविण्यासाठी खूप उत्सुक आहे. तो एक जागतीकस्तरीय खेळाडू आहे आणि तो आमच्या संघात खूप काही जोडणारा आहे यात कोणताही शंका नाही.
आयपीएलच्या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा आठ सामन्यात 12 गुण घेऊन गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे.