यूएईमध्ये घडणार नवा इतिहास, मलिंगाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी भारतीय स्पिनर सज्ज
मुंबई,
आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा 19 तारखेपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेचं विजेतेपद कोण पटकावणार हे समजण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण, आयपीएलचा इतिहास पाहिला तर ज्या टीमचे स्पिन बॉलर्स चांगले आहेत, त्यांना विजेतेपद जिंकण्याची संधी जास्त आहे. याचं कारण म्हणजे आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट घेणार्या टॉप 10 बॉलर्समध्ये 7 स्पिन बॉर्सचा समावेश आहे. पहिल्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा आहे. मलिंगानं 122 मॅचमध्ये 170 विकेटस घेतल्या आहेत. पण, त्यानं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
मलिंगाचा आयपीएलमधील सर्वाधिक विकेटस घेण्याचा रेकॉर्ड यंदा तुटण्याची शक्यता आहे. कारण, दिल्ली कॅपिटल्सचा लेगस्पिनर अमित मिश्रानं 166 विकेटस घेतल्या आहेत. त्याला आता मलिंगाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी आणखी 5 विकेटसची गरज आहे. यूएईमधील पिच आणि वातावरण पाहाता मिश्रा यंदा सर्वाधिक विकेटसचा रेकॉर्ड नक्की करेल असं मानलं जात आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेटस घेणारअया बॉलर्समध्ये तिसर्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा पियूष चावला आहे. त्यानं 164 मॅचमध्ये 156 विकेटस घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या डेन ब-ाव्होच्या नावावरही इतक्याच विकेटस आहेत. त्यानंतर हरभजन सिंग (150 विकेटस), रविचंद्रन अश्विन (139 विकेटस), सुनील नरीन (130 विकेटस) आणि युजवेंद्र चहल (125 विकेटस) यांचा समावेश आहे.
आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानं रद्द करण्यात आला होता. आता उर्वरित 31 सामन्यांचा दुसरा टप्पा यूएईमध्ये होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या लढतीनं हा टप्पा सुरू होणार आहे.