पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ
कराची,
पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे प्रत्येक क्रिकेटपटूच्या मासिक मानधनात एक लाख रुपयांनी वाढ होणार आहे. याचा फायदा देशांतर्गत खेळणार्या 192 क्रिकेटपटूंना होईल.
मानधनामधील वाढ तातडीने केली जाणार आहे. या वाढीमुळे आता प्रथम श्रेणी आणि अ श्रेणी स्पर्धा खेळणार्या क्रिकेटपटूंचे मानधन दरमहा 1,40,000 ते 2,50,000 रुपये झाले आहे. नव्या अध्यक्षांच्या सर्व वर्गांमधील मानधन वाढ करण्याच्या आदेशामुळे ग-ुप डी वर्गातील खेळाडूंच्या वेतनात 250 पट वाढ होणार आहे, असे पीसीबीच्या अधिकार्यांनी सांगितले.
क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ करण्यापूर्वी, अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर रमीझ राजा यांनी पाकिस्तान टी-टवेन्टी वर्ल्डकप संघाच्या प्रशिक्षकपदी मॅथ्यू हेडन आणि व्हर्नान फिलेंडर यांची अनुक्रमे मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक निवड केली आहे.
पीसीबी अध्यक्षांनी सध्या भारतासोबत पुन्हा सुमधूर संबंध बनवणे कठीण असल्याचे नवे पीसीबी अध्यक्ष राजा यांचे म्हणणे आहे. राजकारणामुळे खेळावर वाईट परिणाम पडला आहे. त्यामुळे भारतासोबत (बीसीसीआय) संबंध सुधारण्यासाठी आम्ही घाई करणार नाही.
सध्या, आम्हाला आमच्या देशांतर्गत आणि स्थानिक क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहेङ्ग, असे राजा म्हणाले.
रमीज राजा यांना 24 ऑॅक्टोबर रोजी दुबईत होणार्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-टवेन्टी वर्ल्डकप सामन्याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी, पाकिस्तानी क्रिकेटपटूंना भेटलो, तेव्हा मी त्यांना सांगितले की, यावेळी भारताविरुद्ध समीकरण बदलायला हवे. या सामन्यासाठी संघ 100 टक्के तयार असावा आणि त्यात त्याने चांगली कामगिरी केली पाहिजे, असे राजा म्हणाले.