बेलफास्ट एकदिवशीय : शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वे पराभूत, टेलरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप
बेलफास्ट,
जोशुआ लिटिल (33 धावात तीन गडी) आणि अँडी मॅकब-ाइन (26 धावात तीन गडी) च्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आयरलँडने येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळण्यात आलेल्या तिसर्या आणि शेवटच्या एकदिवशीय सामन्यात झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करुन मालिका 1-1 ने बरोबरीत ठेवली.
आयरलँडचा कर्णधार अॅड्रयू बालबर्नीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय केला. झिम्बाब्वेचा संघ प्रथम फलंदाजी करत 34 षटकामध्ये सर्वबाद 131 धावसंख्या करु शकला.
सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने दुसर्या डावातील खेळाला कमी करुन 32 षटकांचा केला गेला आणि आयरलँडला 118 धावांचे संशोधीत लक्ष्य मिळाले. आयरलँडने लक्ष्याचा पाठलाग करत 22.2 षटकांमध्ये तीन गडी गमवून 118 धावा केल्या व सामना जिंकला.
या आधी झिम्बाब्वेची सुरुवात खूप खराब राहिली आणि सलामीचा फलंदाज ब-ेंडन टेलर (7) आणि यष्टीरक्षक -फलंदाज रेजिस चकाब्वा (5) लवकरच बाद झाले. टेलरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा शेवटचा सामना होता. त्याने याबाबची घोषणा दुसर्या सामन्याच्या दरम्यान केली होती.
सलामीचे दोनीही फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार क्रेग इर्वीनने सहजपणे फलंदाजी करत 65 चेंडूत सात चौकार व एका षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्यांच्या व्यतिरीक्त एकही फलंदाज जास्त यशस्वी राहिले नाही.
आयरलँडच्या गोलंदाजीनी शानदार गोलंदाजी केली. लिटिल आणि मॅकब-ाइनच्या व्यतिरीक्त सिमी सिंहने दोन आणि शेन गेटकेटने एक गडी बाद केला.