बिसीसीआय समोर झुकलं इंग्लंड बोर्ड,आयसीसीला लिहिलेलं पत्र मागे घेणार!
लंडन,
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट रद्द करण्यात आली. ही टेस्ट न खेळताच टीम इंडियाचे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी युएईला रवाना झाले. याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहिलं. भारताचा एकही खेळाडू पॉझिटिव्ह नव्हता, तरीही टीम इंडियाने ही मॅच खेळली नाही, त्यामुळे ही मॅच फॉरफिट समजण्यात यावी, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. ही टेस्ट फॉरफिट करण्यात आल्याचं आयसीसीने जाहीर केलं तर भारत आणि इंग्लंड यांच्यातली ही सीरिज 2-2 ने बरोबरीत सुटली असं आयसीसी घोषित करेल. तर दुसरीकडे टेस्ट मॅच रद्द झाल्याचं आयसीसीने सांगितलं तर ही सीरिज भारताच्या नावावर 2-1 ने होईल.
सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार ईसीबी आयसीसीला लिहिलेलं हे पत्र मागे घेऊ शकतं. पुढच्या वर्षी टीम इंडिया इंग्लंडमध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या दौर्यात दोन अधिकच्या टी-20 किंवा एक टेस्ट खेळण्याची ऑॅफर बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला दिली आहे, पण या दौर्यातली पाचवी टेस्ट स्थगितच मानली जावी, अशी अट बीसीसीआयने ठेवली आहे.
मॅनचेस्टर टेस्ट रद्द झाल्यानंतर बीसीसीआय आणि ईसीबी यांच्यातला वाद वाढला होता. इंग्लंडच्या काही खेळाडूंनी अखेरच्या क्षणी आयपीएलमधून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे प्ले-ऑॅफमध्येही इंग्लंडचे खेळाडू खेळणार नसल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सीरिजमुळे हे खेळाडू प्ले-ऑॅफमधून माघार घेण्याची शक्यता आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाचव्या टेस्टचं भवितव्य आयसीसीवर अवलंबून आहे. ही सीरिज 4 टेस्ट मॅचची का 5 टेस्ट मॅचची, यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे पॉईंटसही निश्चित होणार आहेत.
टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफने 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आयसीसीने जर पाचवी टेस्ट कोरोनामुळे रद्द झाल्याचं मान्य केलं, तर ईसीबीला विम्याचे पैसे मिळणार नाहीत, कारण यामध्ये कोरोनाचा मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला नाही. या परिस्थितीमध्ये इंग्लंडला जवळपास 550 कोटी रुपयांचं नुकसान होईल. 2020-2024 च्या ब-ॉडकास्टिंग करारानुसार जर एक अतिरिक्त टेस्ट खेळवली गेली तर हे नुकसान 100 कोटी रुपयांनी कमी केलं जाऊ शकतं.