कोलंबो टि-20 दक्षिण अफ्रिकेचा श्रीलंकेवर विजय, मालिकेत 2-0 ने आघाडी
कोलंबो,
क्विंट डी कॉक (नाबाद 58) च्या शानदार डावाच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेने येथील आर.प्रेमदासा मैदानावर खेळण्यात आलेल्या दुस-या टि-20 सामन्यात श्रीलंकेला नऊ गडी राखून पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय केला आणि यजमान संघाने 18.4 षटकामध्ये सर्वबाद 103 धावसंख्या केली. याला उत्तर देताना पाहुण्या दक्षिण अफ्रिकेने 14.1 षटकामध्ये एक गडी गमवून लक्ष्याला गाठत सामना जिंकला.
डी कॉकने 48 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा केल्या आणि संघाला सामना जिंकून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. अँडन माक्रमने डी कॉकला खूप चांगल्या पध्दतीने साथ दिली व त्यांने नाबाद 19 चेंडूत तीन चौकरांच्या मदतीने 21 धावा केल्या. वनिंदु हसारंगाने श्रीलंकेकडून एकमेव गडी बाद केला.
सामन्यात श्रीलंका संघाची फलंदाजी सुरुवातीला खूप खराब राहिली आणि सलामीचा फलंदाज कुशल परेरा (30) आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश चांदीमल दुस-या षटकामध्ये पाच धावा करुन बाद झाला. परेराने सर्वाधिक धावा करत 25 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 30 धावा केल्या. परेराच्या व्यतिरीक्त भानुका राजपक्षेने 13 चेंडूत तीन चौकार व एका षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या.
या दोघां फलंदाजांच्या व्यतिरीक्त अन्य कोणताही फलंदाज वीस धावसंख्येच्या पुढे जाऊ शकला नाही. दक्षिण अफ्रिकन गोलंदाजीनी शानदार प्रदर्शन केले. यात मारक्रम आणि तबरेज शम्सीने प्रत्येकी तीन तर ब्योर्न फोर्टुइनने दोन आणि एनरिच नॉर्त्जे आणि कर्णधार केशव महाराजने प्रत्येकी एक गडी बाद केला. दोनीही संघातील मालिकेतील तिसरा व शेवटचा टि-20 सामना 14 सप्टेंबरला खेळला जाईल.