जसप्रीत बुमराहला मागे टाकत जो रूटने जिंकला आयसीसी प्लेयर ऑॅफ द मंथचा पुरस्कार

दुबई,

आयसीसीने ऑॅगस्ट महिन्यातील बेस्ट प्लेयरची घोषणा आज केली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट प्लेयर ऑॅफ द मंथ ठरला आहे. जो रूटने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडला होता. त्याने या मालिकेत 3 शतक ठोकले होते.

जो रूटने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीला मागे टाकत हा पुरस्कार आपल्या नावे केला. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारताविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यातील 7 डावात खेळताना 94 च्या सरासरीने 564 धावा केल्या आहेत. या मालिकेत जसप्रीत बुमराहने देखील चांगली गोलंदाजी करत 18 गडी बाद केले होते.

जो रूटने लॉर्डस कसोटी सामन्यात भारताविरुद्ध शानदार 180 धावांची खेळी केली. तो नाबाद राहिला होता. यानंतर त्याने ट्रेंट बि-ज आणि लीड कसोटी देखील शतक झळकावले होते. जो रूटने जगातील दोन अव्वल गोलंदाजांना मागे टाकत आयसीसीचा पुरस्कार जिंकला. शाहिन शाह आफ्रिदीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत 18 गडी बाद केले होते. त्याने दुसर्‍या कसोटी सामन्यात 10 गडी बाद केले होते. असा कारमाना करणारा तो पाकिस्तानाचा चौथा युवा गोलंदाज आहे.

आयसीसी वोटिंग अकॅडमी पॅनलचे प्रमख आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जे पी ड्यूमिनीने सांगितंल की, जो रूटवर एक कर्णधार म्हणून अधिक जबाबदारी होती. त्याच्याकडून मोठी आपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजीत आपलं योगदान दिले, ते पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. तो आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये देखील अव्वल आहे.

महिलामध्ये एमियर रिचर्डसनने जिंकला पुरस्कार

आयर्लंडची दिग्गज महिला खेळाडू एमियर रिचर्डसन महिलांमध्ये प्लेयर ऑॅफ द मंथ पुरस्काराची मानकरी ठरली. तिने आयसीसी महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीत चांगली कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धेत तिने 4.19 च्या इकोनॉमीने एकूण 7 गडी बाद केले. याशिवाय तिने फलंदाजीत 76 धावांचे योगदान दिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!