न्यूझीलँड संघ 18 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये दाखल
इस्लामाबाद
न्यूझीलँडचा क्रिकेट संघ 18 वर्षानंतर प्रथमच पांढर्या चेंडूने खेळण्यात येणार्या तीन एकदिवशीय आणि पाच टि-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये दाखल झाला आहे
पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) ने न्यूझीलँड दौराचा प्रसिध्द केल्या कार्यक्रमानुसार टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलँडचा संघ शनिवारी इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. 15 सप्टेंबर पासून सराव सुरु करण्याच्या आधी संघाला तीन दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागेल.
2002 मध्ये कराचीमधील संघाच्या हॉटेलच्या बाहेर झालेल्या बाँबस्फोटानंतर न्यूझीलँडने आपला पाकिस्तानचा दौरा अर्धवट सोडला होता. ब्लॅक कॅप्सने 2003 मध्ये पाच एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळली होती जो संघाचा पाकिस्तानचा शेवटचा दौरा होता.
आगामी दौर्यात रावळपिडीमध्ये 17,19,21 सप्टेंबरला खेळण्यात येणार्या तीन एकदिवशीय सामन्यांचा समावेश हा आयसीसी एकदिवशीय सुपर लीगमध्ये होणार नाही तर याला द्विपक्षीय मालिकेच्या आधारावर खेळले जाईल. पाकिस्तानचे नऊ सामन्यांपैकी चारमध्ये विजयासह 40 गुण आहेत व गुणतालिकेत ते सहाव्या स्थानावर आहेत. न्यूझीलँडने तीन सामने जिंकून 30 गुण मिळविले असून ते गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहेत.
तीन एकदविशीय सामन्यानंतर न्यूझीलँडचा संघ पाकिस्तान विरुध्द सप्टेंबर 25, 26 व 29 ऑक्टोंबरला आणि 1 व 3 नोव्हेंबरला लाहौरमधील गद्दाफी मैदानावर पाच टि-20 सामने खेळणार आहेत.