अफगाण महिला कशा प्रकारे क्रिकेट खेळतील या स्थितीला स्पष्ट करुत – फजली
काबुल
अफगाणिस्तानमधील महिला कशा प्रकारे क्रिकेट खेळू शकतील या बाबतच्या स्पष्ट स्थितीला सांगूत आणि महिला संघातील सर्व 25 खेळाडू अफगाणिस्तानमध्येच आहेत व त्यांनी देशाला सोडलेले नाही असे स्पष्टीकरण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (एसीबी) चे कार्यवाहक अध्यक्ष अजिजुल्लाह फजलीनी दिले.
फजलीनी एसबीएस रेडिओ पाश्तोला सांगितले की आम्ही या बात स्पष्ट स्थिती देऊत की आम्ही कशा प्रकारे महिलांना क्रिकेट खेळण्याची परवानगी प्रदान करुत. खूप लवकरच आम्ही चांगली बातमी देऊत की कशा प्रकारे आम्ही लोक यावर पुढे जाऊत.
फजलीचे ताजे निवेदन हे तालिबान संस्कृति आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्लाह वासिकच्या वक्ताव्यापेक्षा वेगळ आहे. वासिक यांनी बुधवारी या रेडिओ ब-ॉडकास्टला सांगितले होते की महिलांनी क्रिकेटसह अन्य खेळ खेळावे हे जरुरीचे नाही. क्रिकेटमध्ये अशी स्थिती येऊ शकते जेथे महिलांचा चेहरा आणि शरीर झाकलेले नसेल.
फजलीनी म्हटले की महिला क्रिकेटर आपल्या घरात सुरक्षीत असून महिला क्रिकेटच्या प्रशिक्षक डियाना बाराकजईही सुरक्षीत आहेत. ते सर्वजण देशातील आप आपल्या घरीच राहत आहेत. अनेक देशांनी त्यांना अफगाणिस्तान सोडण्यासाठी सांगितले परंतु त्यांनी देशाला सोडले नाही आणि सध्या हे सर्वजण आपल्या जागी आहेत.
फजलीनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आवाहन करत म्हटले की त्यांनी या वर्षी नोव्हेंंबरमध्ये होबार्टमध्ये होणार्या अफगाणिस्तान व ऑस्ट्रेलिया पुरुष संघातील एकमेव कसोटी सामन्याला रद्द करु नये. आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विनंती करतोत की त्यांनी अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या ऐतिहासीक क्रिकेट सामन्याला उशिर करु नये.