राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी मुंबई संघ रवाना
मुंबई,
भारतीय शूटिंग बॉल फेडरेशन व राजस्थान शूटिंग बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजस्थान येथे होणार्या 39व्या राष्ट्रीय शूटिंग बॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई संघ रवाना झाला.
या संघात अय्याज सय्यद (संघनायक), महेश कदम, दिनेश वर्होकर, भावेश वाघेला, सचिन बलसाने, अभिजीत बनसोडे, अर्जुन भंडारे, शैलेंद्र निकाळे यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून अशोक बलसाने व प्रशिक्षक म्हणून जालंदर चकोर संघाबाहेर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेचे सचिव दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे सहसचिव तसेच प्रशिक्षक जालंदर चकोर यांच्या प्रशिक्षणाखाली मुंबई शूटिंग बॉल असोसिएशनचा संघ सराव करत होता.
राष्ट्रीय शूटिंग बॉल अजिंक्यपद पुरुष व महिला गट स्पर्धा टागोर इंटरनॅशनल स्कूल, भद्रा, (जि. हनुमानगड) येथे 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. सामने विद्युत रोषणाईमध्ये खेळवले जाणार आहेत.