ऑस्ट्रेलिया संघ अफगाणिस्तान विरुध्द कसोटी खेळण्यास इच्छुक नाही – पेन
सिडनी
जो देश (अफगाणिस्तान) आपल्या लोकांच्या बरोबर भेदभाव करतो आशा देशा बरोबर आम्ही क्रिकेट खेळू इच्छिणार नाहीत असे मत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार टिम पेनने व्यक्त केले. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये या वर्षी नोंव्हेंबरमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे.
अफगाणिस्तानमधील नवनिर्वाचित तालिबान सरकारने महिलांच्या क्रिकेट खेळण्याला विरोध करण्याची घोषणा केल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या पुरुष संघामधील एकमेव होणार कसोटी सामनाही रद्द करणे निश्चित मानले जात आहे.
9 सप्टेंबरला प्रसिध्द एका निवेदनात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दुजोरा दिला की जर महिलांच्या क्रिकेट खेळण्यावर तालिबानच्या विचारांच्या बातम्या खर्या आहेत तर आम्ही 27 नोव्हेंबर पासून होबार्टमध्ये खेळण्यात येणार्या एकमेव कसोटी सामन्यासाठी पुढे जाण्यास असमर्थ असूत.
निवेदनात म्हटले गेले की जागतीकस्तरावर महिला क्रिकेटच्या विकासाला गती देणे क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी अविश्वसनीयपणे महत्वपूर्ण आहे. क्रिकेटसाठी आमचा दृष्टिकोण हा आहे की हे सर्वांसाठी एक खेळ आहे आणि आम्ही प्रत्येकस्तरावर महिलांसाठी खेळाचे समर्थन करत आहोत.
पेनने म्हटले की मला वाटत नाही की आम्ही अशा देशां बरोबर जोडू इच्छितो की जे आपल्या अर्ध्या लोकसंख्येकडून संधी किंवा गोष्टींना हिसकावून घेत आहेत. ही दुखाची गोष्ट आहे. आम्ही आयसीसीचे काहीही ऐकू इच्छित नाहीत. एक महिन्यात टि-20 विश्व कप आहे आणि मला वाटते की यामध्ये अफगाणिस्तानला भाग घेणे अशक्य आहे.