मला वाटते की मी थोडया फार सन्मानाचा हकदार आहे – ताहिर

दुबई

दक्षिण अफ्रिका संघ व्यवस्थापन जो मला बेकार मानतो आहे त्यांच्याकडून मी थोडया फार सन्मानाचा हकदार आहे असे मत संघातील लेग फिरकी गोलंदाज इम-ान ताहिरने व्यक्त केले.

ताहिरने म्हटले की ज्यावेळे पासून मार्क बाउचर संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे त्यावेळे पासून टि-20 विश्व कपच्या योजनां बाबत माझ्याशी कोणताही संवाद झालेला नाही.

ताहिर 17 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत ओमान आणि यूएईमध्ये आयोजीत होणार्‍या टि-20 विश्व कपसाठी दक्षिण अफ्रिका संघात सामिल नाही. ताहिरने 2019 च्या विश्व कपनंतर एकदिवशीय सामन्यातून निवृत्ती घेतली होती. परंतु त्याने स्वत:ला टि-20 सामन्यांसाठी उपलब्ध ठेवले होते.

ताहिरने म्हटले की, मी संघात नाही हे मला चांगले वाटत नाही. मागील वर्षी ग-ीम स्मिथने माझ्याशी बोलणे केले होते आणि म्हटले होते की मला वाटते की तू विश्व कप खेळावे. जो ऑस्ट्रेलियामध्ये होता. मी स्पष्टपणे सांंगितले की मी उपलब्ध आणि उत्साहित तसेच सन्मानीत आहे कारण तो मला सन्मान देतो आहे मी यासाठी तयार आहे.

त्याने म्हटले की मी कठोर मेहनत करत आहे आणि तुम्ही या सर्व लीगमधील माझे प्रदर्शन पाहू शकतात. यामुळे ते मला पसंत करतात. त्यांनी म्हटले होते की ते एबी डिव्हिलियर्स आणि फाफ डू प्लेसिस सारख्या अन्य लोकांशी बोलणे करणार आहेत. त्यांनी मला दक्षिण अफ्रिकेच्या ग-ुपमध्ये सामिल केले परंतु नंतर कोणीही माझ्याशी संपर्क केला नाही.

ताहिरने म्हटले की काही महिन्यानंतर मी स्मिथ आणि बाउचरला संदेश पाठविला परंतु कोणीही मला उत्तर दिले नाही. ज्यावेळे पासून बाउचर प्रशिक्षक बनला आहे त्याने माझ्याशी एकदाही संपर्क केलेला नाही आणि त्यांची योजना काय आहे यावरही बोलणे केले नाही. हे खरेच दुखाची गोष्ट आहे. मी दहा वर्ष देशाची सेवा केली आणि मला वाटते की मी या लोकांंच्या तुलनेत थोडा अधिक सन्मानासाठी पात्र आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!