रवी शास्त्री आणि विराट कोहलीला अटक करा, संतप्त क्रिकेटप्रेमींची मागणी

मुंबई,

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यानंतर बोलिंग कोच भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनाही कोरोनाची लागण झाली. या कोरोनामुळे पाचवा आणि मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सामना रद्द करण्यात आला. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये याबाबत चर्चा झाली. त्यानंतर हा सामना रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने चौथा सामना जिंकून 2-1 ने आघाडी घेतली. पण आता पाचवा सामना रद्द झाल्याने भारतीय क्रीकेटप्रेमी प्रचंड नाराज झाले आहेत. अनेकांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांना ट्रोल करत आहेत. काहींनी तर थेट रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीला अटक करण्याचीही मागणी केली आहे.

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासह भारताचे प्रमुख क्रिकेटपटू आणि सहाय्यक स्टाफ सदस्यांनी लंडनमध्ये एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला बरीच गर्दी झाली होती. कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आलं नव्हतं. तर अनेकांनी मास्कही लावले नव्हते. यानंतर, 5 सप्टेंबर 2021 रोजी, रवी शास्त्री यांची अँटीजन चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये ते कोरोना संक्रमित असल्याचे निष्पन्न झालं.

या कार्यक्रमानंतर रवी शास्त्रींसोबत असणारे गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या चाचणीचे अहवालसुद्धा सकारात्मक आले आहेत, यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे खेळाडूंनाही करोना संसर्गाचा धोका असल्याचं सांगत कसोटी रद्द करावी लागली.

कसोटी रद्द झाल्यानतंर अनेक क्रीकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. एका चाहत्याने तर शास्त्री आणि कोहलीला अटक करा अशी मागणी करणारं टिवटच केलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!