पाचवी टेस्ट रद्द झाल्यानंतर मालिकेचा निकाल काय असणार?

मॅनचेस्टर

अखेर ज्याची भिती होती तेच झालं. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यानंतर बोलिंग कोच भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनाही कोरोनाची लागण झाली. या कोरोनामुळे पाचवा आणि मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सामना रद्द करण्यात आला. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये याबाबत चर्चा झाली. त्यानंतर हा सामना रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती. आतापर्यंत 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने चौथा सामना जिंकून 2-1 ने आघाडी घेतली. मात्र आता हा पाचवा सामना रद्द झाल्याने ट्रॉफी कोणाला मिळणार, असा सवाल क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. ही मालिका कोणाला मिळणार याबबातची मोठी अपडेट समोर आली आहे. मालिकेचा निकाल काय?

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, रद्द करण्यात आलेला पाचवा कसोटी सामना हा काही ठराविक दिवसांनी खेळवण्यात येईल. सध्या टीम इंडिया 2-1 च्या फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाला ही मालिका जिंकण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल किंवा अनिर्णित ठेवावा लागेल.

इंग्लंड क्रिकेट बोर्डानुसार, जर टीम इंडियाने पाचवा कसोटी सामन्यातून माघार घेतली, तर तो सामना टीम इंडियाने गमावला असा अर्थ होईल. त्यामुळे मालिका 2-2 ने बरोबरीत होईल. कारण, याआधी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेली कसोटी मालिका यजमान संघाने जिंकली होती. ईसीबीने ही सर्व माहिती पत्राद्वारे दिली होती. मात्र त्यानंतर ईसीबीने या भूमिकेवरुन माघार घेत टीम इंडियाच मालिकेत आघाडीवकर असल्याचं स्पष्ट केलं. या सर्व प्रकारामुळे जो काही त्रास झाला, याबाबत ईसीबीने माफीही मागितली. तसेच हा सामना काही दिवसांनी खेळवण्यात येईल, अशीही माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या पाचव्या सामन्यासह मालिकेचं काय होणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!