बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक विजेत्या कृष्णा नागरला व्हायचे होते क्रिकेटर

जयपूर,

टोकियो पॅराऑॅलिम्पिकमध्ये भारतीय पॅरा अ‍ॅथलिटनी दमदारी कामगिरी केली. यात बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागर याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. यानंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशात त्याला बॅडमिंटनपटून नव्हे क्रिकेटर व्हायचं होतं, ही बाब समोर आली आहे. याची कबुली खुद्द कृष्णा नागर यानेच दिली आहे. दरम्यान, कमी उंचीमुळे त्याचे क्रिकेटर होण्याची स्वप्न भंगले.

कृष्णा नागर म्हणाला की, मला सुरूवातीच्या काळात क्रिकेट खेळणे पसंत होते. पण नंतर मी बॅडमिंटनच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करता येईल. याचा विचार केला. यामुळे मी हाती रॅकेट घेतलं आणि कठोर सरावाला सुरूवात केली. मला यात माझे मित्र तसेच कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळाला. त्यांनी मला या खेळात नाव कमावण्यासाठी प्रेरित केलं.

कृष्णा नागर याच्या वडिलांनी सांगितलं की, ग-ोथ हार्मोंर्नच्या कमतरतेमुळे कृष्णाची उंची वाढू शकली नाही. त्याची उंची 4 फूट 2 इंच इतकीच राहिली. तरीदेखील आमचे कुटुंब निराश झालो नाही. उलट आम्ही त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं.

कृष्णा नागर याने कमी उंचीच्या खेळाडूंच्या गटात बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक जिंकले. तो म्हणाला, पॅराऑॅलिम्पिकमधील अंतिम सामन्याची मी खूप आतूरतेने वाट पाहत होते. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर मी माझ्या भावनांवर आवर घालू शकलो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन करुन शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी देखील मला प्रेरित करत माझा गौरव केला.

दरम्यान, टोकियो पॅराऑॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 19 पदके जिंकली. या कामगिरीसह भारत पदकतालिकेत 24 व्या स्थानावर राहिला. यात पाच सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कास्य पदकाचा समावेश आहे. भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!