बुमराह, रुट आणि अफरीदी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी नामित

दुबई,

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, इंग्लंंडचा कर्णधार जोए रुट आणि पाकिसतानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफरीदीला ऑगस्ट 2021 च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या प्लेयर ऑफ द मंथसाठी नामित केले आहे.

बुमराहने इंग्लंडच्या विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी करत नऊ गडी बाद केले होते. तर लॉर्डसमधील दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दरम्यान मोहम्मद शमी बरोबर 89 धावांची भागेदारी केली होती. यामुळे भारताने हा कसोटी सामना जिंकला होता.

इंग्लंडचा कर्णधार जोए रुटने भारताच्या विरुध्द पहिल्या तीनीही कसोटीमध्ये शतक केले आणि त्याच्या तिसर्‍या कसोटीतील शतकाच्या जोरावर इंग्लंडने भारताला पराभूत करुन मालिककेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

ऑगस्ट महिन्यात खेळण्यात आलेल्या पाकिस्तान आणि वेस्टइंडिजमधील दोन कसोटी सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन अफरीदीने धारदार गोलंदाजी करत 18 गडी बाद केले होते.

थायलँडची नट्टाया बूचथम आणि आयरलँडची गॅबी लुईस आणि इमियर रिचर्डसन या जोडीला ऑगस्ट 2021 साठी महिला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकित करण्यात आले आहे. लुईस आणि रिचर्डसनच्या जोडीने ऑगस्टमध्ये आयसीसी महिला टि-20 विश्व कप यूरोप क्वालीफायरमध्ये आयरलँडकडून चारपैकी तीन सामने जिंकण्यात महत्वाची भूमिका निभावली होती.

स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यामध्ये जर्मनीवरील 164 धावांच्या विजयाच्या दरम्यान लुईस महिलां क्रिकेटमधील टि-20 सामन्यात शतक करणारी आयरलँडची पहिली खेळाडू बनली. तिने या सामन्यात 11 चौकार आणि तीन षटकार मारले.

या दरम्यान रिचर्डसनला यूरोप क्वालीफिायरमध्ये प्लेअर ऑफ द टूनामोटसाठी निवडले गेले. फलंदाजी आणि गोलंदाजी दोनीहीमध्ये तिने योगदान दिले होते. तिने 4.19 च्या सरासरीने 7 गडी बाद केले होते तर 76 धावा केल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!