कसोटीतील शेवटच्या दिवशी जडेजा महत्वाची भूमिका निभावेल – राठौड

लंडन,

इंग्लंड विरुध्द सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी भारताचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा हा महत्वाची भूमिका निभावेल असा विश्वास भारतीय संघाचा फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठौडने व्यक्त केला.

रवींद्र जडेजाला पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये रविंचंद्रन अश्विनच्या जागी घेतले गेले आहे आणि त्याला फलंदाजीमध्ये पाचव्या क्रमांकावर उतरविले आहे.

फलंदाज प्रशिक्षक राठौड यांनी म्हटले की मला वाटते की शेवटच्या दिवशी जडेजा महत्वाची भूमिका निभावेल. कारण पाचव्या दिवशी खेळपट्टी फिरकीला मदतगार होऊ शकते आहे. जडेजा चांगली गोलंदाजी करत असून तो नियंत्रीत होऊन गोलंदाजी करत आहे. मागील 5-6 षटकामध्ये त्यांने खूप संधी निर्माण केल्या होत्या.

त्यांनी म्हटले की पाचव्या दिवशी भाग्याने साथ दिली तर या संधीतून गडी बाद केले जाऊ शकतात. जडेजा या कारणामुळेच महत्ववूर्ण भूमिका निभावेल. त्याच्या व्यतिरीक्त मध्यम वेगवान गोलंदाजांनाही चांगले करावे लागेल.

फलंदाज प्रशिक्षक राठौडने जडेजाला चौथ्या कसोटीत अजिंक्य रहाणे आणि ॠषभ पंतपेक्षा वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठविण्या मागील कारण सांगत म्हटले की ही योजना डावा-उजवा संयोजनला कायम ठेवण्याची होती. पंत आणि जडेजा  डाव्या हाताने फलंदाजी करतात  आणि क्रमांक सहा आणि क्रमांक 7 वर साथ असतात. आम्ही त्यांना ब-ेक देऊ इच्छित होतोत. जडेजाने मागील सामन्यात आत्मविश्वसाने फलंदाजी केली आणि आम्ही पाहू इच्छित होतो की तो कशा प्रकारे मध्यक्रमामध्ये आमच्या संतुलनावर प्रभाव टाकतो. मात्र अजूनही हे सांगू शकत नाहीत की हा दिर्घकालीक पर्याय असेल.

त्यांनी याच बरोबर रहाणेकडून सतत धावा न करण्यावर चिंता व्यक्त केली नाही. राठौड यांनी म्हटले की मी आधीही म्हटले होते की ज्यावेळी आपण दिर्घकाळा पासून क्रिकेट खेळत आहोत तर आपण अशा काळातून जात असतो जेथे आपण धावा करु शकत नाहीत. हा असा काळ आहे ज्यावेळी आपण त्यांचे समर्थन केले पाहिजे. आपण असेच चेतेश्वर पुजारा बरोबरही पाहिले आहे. मला आशा आहे की रहाणे फॉर्म मिळवेल आणि भारतीय संघातील फलंदाजीमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!