भारत-इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत; लंच ब-ेकपर्यंत इंग्लंडच्या 2 बाद 131 धावा

मुंबई,

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळली जात आहे. सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सेशनपर्यंत इग्लंडने दोन विकेट गमावत 131 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अजूनही 244 धावांची गरज आहे. इंग्लंडचे सलमीचे फलंदाज रॉरी बर्न्स आणि हासीब हमीद यांनी संघाचा चांगली सुरुवात करुन दिली. बर्न्सने पाच चौकारांच्या मदतीने 125 चेंडून 50 धावा केल्या. शार्दुल ठाकुरने त्याला बाद केलं. तर त्यानंतर आलेल्या डेविड मलान पाच धावा करुन बाद झाला. सध्या हासीब हमीद 62 धावा तर कर्णधार जो रुट 8 धावांवर खेळ खेळत आहेत.

चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य दिले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंड संघाने चौथा दिवसाचा खेळ संपेपर्यंत कोणतीही विकेट गमावून 77 धावा केल्या होत्या. शार्दुल ठाकूर आणि यष्टीरक्षक फलंदाज ॠषभ पंत यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध रविवारी चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसर्‍या डावात 466 धावा केल्या. टीम इंडियाने 367 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने इंग्लंड समोर आता विजयासाठी 368 धावांचं टार्गेट ठेवलं आहे. शार्दुल ठाकूरने 60 धावा तर ॠषभ पंतने 50 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

शार्दुल ठाकूरने 72 चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 60 धावा आणि ॠषभ पंतने 106 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने तीन, ओली रॉबिन्सन आणि मोईन अलीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर जेम्स अँडरसन, कर्णधार जो रूट आणि क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय फलंदाजांनी दुसर्‍या डावात चमकदार कामगिरी केली. कर्णधार विराट कोहलीने 96 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!