टीम इंडियाच्या अडचणींत वाढ; रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा दुखापतग-स्त

ओव्हल,

टीम इंडियाला इंग्लंडच्या विरोधात खेळवण्यात येणार्‍या कसोटी मालिकेत मोठा धक्का बसण्याची शक्यता असून टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा दुखापग-स्त आहेत. लवकरच रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराच्या दुखापतीबाबतची अधिकृत माहिती दिली जाऊ शकते.

दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसबाबत टीम इंडियाच्या वतीने माहिती जारी करण्यात आली आहे. फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी म्हटले आहे की, सोमवारी संध्याकाळपर्यंत रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराच्या फिटनेसबाबत स्पष्टता मिळू शकते.

दोन्ही खेळाडूंच्या स्कॅनबाबतही विक्रम राठोड यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा दोघांनाही स्कॅनसाठी पाठवण्यात आले होते. तिसर्‍या दिवशी फलंदाजी केल्यानंतर रोहित आणि पुजारा दोघेही चिंतेत दिसून आले. सोमवारी संध्याकाळपर्यंत दोन्ही खेळाडूंची स्कॅन रिपोर्ट समोर येईल.

दरम्यान इंग्लंड विरोधात खेळवण्यात येणार्‍या ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने 127 धावांची खेळी केली. तिसर्‍या दिवसाच्या खेळ संपल्यानंतर रोहित शर्माचे काही फोटो समोर आले होते. त्यामध्ये त्याच्या पायावर बॉल लागल्याचे निशाण दिसत होते.

दुसर्‍या डावात एक धाव घेताना चेतेश्वर पुजाराला दुखापत झाल्यामुळे सामना काही वेळासाठी थांबवावाही लागला होता. पण, पुजारा फिजियो ट्रिटमेंटनंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. दरम्यान, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा चौथ्या दिवशी फिल्डिंगसाठी मैदानावर उतरले नव्हते. पाचव्या दिवशीही दोन्ही खेळाडू मैदानावर उतरण्याची शक्यता फारच कमी आहे.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने शार्दुल ठाकूर आणि यष्टीरक्षक फलंदाज ॠषभ पंत यांच्या शानदार फलंदाजीमुळे इंग्लंडविरुद्ध रविवारी चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसर्‍या डावात 466 धावा केल्या. 367 धावांची आघाडी टीम इंडियाने घेतली असून इंग्लंडसमोर आता टीम इंडियाने विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!