महिला क्रिकेट : दक्षिण अफ्रिकेला 1-0 ने आघाडी
अॅटिगा,
लिजेल ली (75) च्या शानदार डावाच्या जोरावर दक्षिण अफ्रिका संघाने येथील सर व्हिव्हियन रिचर्डस मैदानावर खेळण्यात आलेल्या दुसर्या टि-20 सामन्यात वेस्टइंडिज महिला क्रिकेट संघाला 50 धावाने हरविले आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
वेस्टइंडिजची कर्णधार किसिया नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय केला. दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांमध्ये तीन गडी गमवून 165 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या यजमान वेस्टइंडिजचा संघ वीस षटकांमध्ये आठ गडी गमवून 115 धावा करु शकला.
दक्षिण अफ्रिकेकडून लीने 52 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 75 धावा केल्या. तिच्या व्यतिरीक्त लौरा वोल्वार्ट नऊ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 33 धावा करुन नाबाद राहिली. वेस्टइंडिजकडून हेले मॅथ्यूजने दोन, कियाना जोसेफने एक गडी बाद केला.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्टइंडिज संघाची सुरुवात चांगली राहिली नाही आणि पहिला गडी 21 धावसंख्येवर बाद झाला.
चेडिसन नॅशन आणि बि-टनी कूपरने वेस्टइंडिजसाठी प्रत्येकी 26 धावा केल्या. या दोघींच्या व्यतिरीक्त कोणताही फलंदाज वीस धावसंख्येच्या पुढे जाऊ शकला नाही. मरिजैन कपने दक्षिण अफ्रिकेसाठी 31 धावा देऊन तीन गडी बाद केले. तिच्या व्यतिरीक्त अयाबोंगा खाका आणि नोनकुलुलेको म्लाबाने प्रत्येकी दोन आणि मसाबगाला क्लासने एक गडी बाद केला. दोनीही संघातील मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना 4 सप्टेंबरला खेळला जाईल.