पॅरालिम्पिक बॅडमिंटन : भगत आणि पलकची जोडी मिक्सड युगल सामन्यात पराभूत

टोकियो

भारताचा प्रमोद भगत आणि पलक कोहलीची जोडी येथे सुरु असलेल्या टोकियो पॅरालिम्पिकमधील मिश्रीत युगल एसएल-3 एसयू-5 पॅरा बॅडमिंटनच्या ग-ुप बी सामन्यात फ्राँसच्या फोस्टीन नोएल आणि लुकस माजुरच्या जोडीकडून 1-2 ने पराभूत झाली.

टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या एसएल-3एयू-5 गटमध्ये फ्राँसच्या नोएल आणि लुकास जोडीने भारताच्या भगत आणि पलकच्या जोडीला 43 मिनिट चालेल्या सामन्यात 21-9, 15-21, 21-19 ने पराभूत केले.

फ्राँसच्या जोडीने भगत आणि पलकला पहिल्या गेममध्ये 21-9 अशा सहजपणे हरविले होते. परंतु दुसर्‍या गेममध्ये भारतीय जोडीने जबरदस्त पध्दतीने वापसी करत नोएल आणि लुकसच्या जोडीला 21-15 ने हरविले. निर्णयाक गेममध्ये दोनीही संघामध्ये कडवी टक्कर पाहिला मिळाली परंतु फ्राँसच्या जोडीने भगत आणि कोहलीच्या जोडीला 21-9 ने हरविले.

बॅडमिंटनला पॅरालिम्पिकमध्ये पहिल्यांदाच सामिल करण्यात आले आहे. मात्र या इव्हेंटमध्ये भारताची सुरुवात अपेक्षानुसार राहिली नाही. या पॅरालिम्पिकमध्ये आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत 10 पदक जिंकणार्‍या भारताला मात्र बॅडमिंटनमध्ये एकही पदक मिळालेले नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!