सौरव गांगुलीच्या आईला कोरोनाची लागण, दादाच्या कोरोना टेस्टबद्दल महत्त्वाची अपडेट

कोलकाता,

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या आई निरुपा गांगुली यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोलकातामधील हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री दाखल करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या तपासणीमध्ये कोरोना झाल्याचं निष्पन्न झाले.

निरुपा गांगुली यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांची तब्येत आता स्थिर आहे. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलंय. तसंच चार डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान सौरव गांगुलीची कोरोना चाचणीही यावेळी करण्यात आली, ती निगेटीव्ह आली आहे. गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहशिष गांगुली यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

यापूर्वी दोन जानेवारी रोजी गांगुलीला हार्ट अटॅक आला होता. त्यावेळी त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जानेवारी महिन्याच्या शेवटी तब्येत खालावल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या आजारपणानंतर गांगुली बराच काळ क्रिकेटपासून दूर होता.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्डवर झालेल्या टेस्टच्या दरम्यान गांगुली उपस्थित होता. आता या महिन्यात सुरू होणार्‍या आयपीएल स्पर्धेच्या दुसर्‍या टप्प्याची जबाबदारीही त्याच्यावर आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!