टोक्यो पॅरालीम्पिक, अवनी लखेराचा सुवर्णवेध
टोक्यो,
टोक्यो पॅरालीम्पिक मध्ये भारताच्या अवनी लखेरा हिने महिला 10 मीटर एअरस्पर्धा एसएच 1 मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तिने भारताला या स्पर्धेतील पाहिले सुवर्णपदक मिळवून दिलेच पण ऑॅलिम्पिक मध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. पॅरालीम्पिकचा पाचवा दिवस भारतासाठी शानदार ठरला. या दिवशी तीन पदकांची कमाई खेळाडूंनी केली. डिस्क थ-ो मध्ये योगेश कथूनिया याने रजत पदकाची कमाई केली.
अवनीने भारताची पहिली गोल्डन गर्ल बनण्याची कामगिरी करताना क्वालिफाइंग राउंड मध्ये 21 निशाणेबाजांच्या मध्ये सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पॅरालीम्पिक मध्ये पदक मिळविणारी ती तिसरी भारतीय महिला खेळाडू आहे. भाविना पटेल व दीपा मलिक यांनी या स्पर्धेत पदके मिळविली आहेत. टोक्यो ऑॅलिम्पिक मध्ये पीव्ही सिंधू आणि मीराबाई चानू यांनी पदके मिळविली आहेत.
पॅरालीम्पिक स्पर्धात गोल्ड मिळविणारी अवनी चौथी भारतीय आहे. 1972 मध्ये मुरलीकांत पेटकर, देवेंद्र झांजरिया यांनी दुसरे व तिसरे तर मरीयाप्पन थंगावेलू यांनी चौथे सुवर्णपदक मिळविले आहे. ऑॅलिम्पिक मध्ये भारतासाठी बीजिंग मध्ये अभिनव बिंद्रा आणि टोक्यो मध्ये नीरज चोप्रा यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.