रोहित शर्माची कमाल, शानदार सिक्स मारत दिग्गजाचा रेकॉर्ड ब्रेक
लंडन
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसर्या कसोटीतील तिसर्या दिवसाचा खेळ सुरु आहे. इंग्लंडला 432 धावावंर ऑलआऊट केल्यानंतर टीम इंडिया दुसर्या डावात बॅटिंग करत आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामी जोडीने 34 धावांची संयमी सुरुवात केली. मात्र त्यानंतर केएल राहुल 8 धावा करुन माघारी परतला. मात्र पहिल्या डावाप्रमाणे दुसर्या डावातही मैदानात घट्ट पाय रोवून उभा राहिला. या दरम्यान त्याने एक अफलातून सिक्स मारत विक्रमाला गवसणी घातली. रोहितने या सिक्ससह माजी कर्णधार कपिल देव यांचा रेकॉर्ड ब-ेक केला आहे.
काय आहे रेकॉर्ड?
टीम इंडियाच्या दुसर्या डावातील बॅटिंग दरम्यान ओली रॉबिन्सन 16 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरच्या तिसर्या चेंडूवर रोहितने शानदार अपर कट लगावत सिक्स लगावला. यासह रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या बाबतीत मागे टाकलं. रोहितने मारलेला हा सिक्स त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एकूण 62 सिक्स ठरला. तर कपिल देव यांनी टेस्टमध्ये एकूण 61 सिक्स लगावले होते.
इंग्लंडच्या पहिल्या डावात धावांचा डोंगर
दरम्यान त्याआधी इंग्लंडने टीम इंडियाला पहिल्या डावात अवघ्या 78 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर इंग्लंडने टीम इंडियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. इंग्लंडने पहिल्या डावात ऑल आऊट 432 धावा केल्या. कर्णधार जो रुटने सर्वाधिक 121 धावांची शतकी खेळी केली. तर रॉरी बर्न्स, हसीब हमीद आणि डेव्हीड मलान या तिकडीने अर्धशतकी खेळी केली.