संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आर्मी स्पोटर्स इंस्टीट्यूट, पुणे येथे 27 ऑॅगस्ट 2021 रोजी ऑॅलिंपिक मधे सहभागी झालेल्या सेवा दलांमधील खेळाडूंचा सत्कार करतील
पुणे
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 27 ऑॅगस्ट 2021 रोजी आर्मी स्पोटर्स इन्स्टिट्यूट (एएसआय) पुणे येथे ऑॅलिंपिक मधे सहभागी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करतील. नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू सुभेदार नीरज चोप्रा सह सशस्त्र दलाचे सर्व जवान या प्रसंगी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह या भेटीदरम्यान एएसआय आणि सैन्याच्या नवोदित खेळाडूंशी संवाद साधतील. ते दक्षिण कमांडच्या मुख्यालयाला भेट देतील. यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे आणि दक्षिणी कमांडचे जनरल ऑॅफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन असतील.
भारतीय सैन्य हा नेहमीच भारतीय खेळांचा कणा राहिला आहे – मेजर ध्यानचंद ते सुभेदार नीरज चोप्रा पर्यंत अनेकांनी भारतीय खेळांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांमध्ये आपली नावे कोरलेली आहेत. ऑॅलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याच्या उद्देशाने खेळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रमुख जबाबदारी म्हणून भारतीय लष्करामार्फत ’मिशन ऑॅलिम्पिक’ हा कार्यक्रम 2001 मध्ये हाती घेण्यात आला होता.
एएसआय, पुणे ही भारतीय सैन्याची एक वैशिष्ट्यपूर्ण आणि जागतिक दर्जाची क्रीडा संस्था आहे आणि तिने 34 ऑॅलिंपिक खेळाडू, 22 राष्ट्रकुल क्रीडा पदक विजेते, 21 आशियाई क्रीडा पदक विजेते, सहा युवा क्रीडा पदक विजेते आणि 13 अर्जुन पुरस्कार विजेते घडवले आहेत. या खेळाडूंच्या समर्पणाव्यतिरिक्त, त्यांच्या यशाचे श्रेय एएसआयमधील प्रशिक्षकांच्या मेहनतीलाही आहे.
एएसआय, पुणे ही एक प्रमुख क्रीडा प्रशिक्षण संस्था म्हणून उदयाला आली असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी, त्यांची प्रतिभा ओळखणे, पद्धतशीर प्रशिक्षण देणे , जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, क्रीडा वैद्यकीय सहाय्य, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग, आणि सशस्त्र दल आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघ व इतर क्रीडा संस्थाच्या समन्वयाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक चांगल्या पायाभूत सुविधा सशस्त्र दलांच्या समन्वयाने उपलब्ध करून देते.