दुसर्‍या कसोटीत विंडीजचे फलंदाज परिस्थितीला समजण्यात अपयशी – सिमंस

जमैका,

पाकिस्तान विरुध्दच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात विंडीज संघातील फलंदाज खेळाच्या परिस्थितीला समजण्यास अपयशी  राहिले आणि त्यांनी आपल्या तंत्रचा योग्य वापर केला नाही असे मत वेस्टइंडिज क्रिकेट संघाचा प्रशिक्षक फिल सिमंसने बुधवारी व्यक्त केले.

जमैकातील सबिना पार्कमध्ये खेळण्यात आलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफरीदीने सामन्यात दहा गडी बाद करुन यजमान संघाला दुसर्‍या कसोटीच्या शेवटच्या दिवशी 2019 धावसंख्येवर सर्वबाद केले आणि पाकिस्तानला दोन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधून दिली.

सिमंसने होस्ट ब-ॉडकास्टरला सांगितले की फलंदाजी कशी केली जाते हे आम्हांला माहिती आहे. आम्ही 50 धावांसाठी 110 चेंडूंचा उपयोग केला. आम्ही चांगली फलंदाजी करत होतोत. पहिल्या डावात आम्ही पाहिले की चेंडूने कसे स्विंग करण्यास सुरुवात केली होती. आम्ही परिस्थितीला समजू शकलो नाहीत. आम्ही अजून थोडे सावधपणे खेळू शकत होतोत.

सिमंसने म्हटले की आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली परंतु आमच्या फलंदाजांची त्यांना साथ मिळाली नाही. आम्ही संघाला साथ दिली पाहिजे. कसोटीसाठी चांगल्या फलंदाजाचा संघ बनविण्यासाठी आमचे खेळाडू आपल्या खेळात सुधार करत आहेत. जर काही कमी असेल तर त्याला आम्हांला मिळून सोडविले पाहिजे. आम्हांला आमच्या फलंदाजांचा आत्मविश्वास वाढवावा लागेल व शीर्षवर का होत आहे याकडे आम्हांला लक्ष देण्याची जरुरी नाही.

सिमंसने म्हटले की आमच्याकडे प्रतिभाशाली खेळाडूची कमी नाही जर आपण बाबर आझम आणि केन विलियम्सनला पाहिले तर ते खूप मेहनत करत आहेत आणि आमच्या फलंदाजानीही मेहनत करण्याची गरज आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!