जमैका कसोटी : दुसर्‍या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा विजय, मालिका 1-1 ने बरोबरी

जमैका,

वेगवान गोलंदाज शाहीन अफरीदीच्या 44 धावात तीन बळींच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने येथील सबिना पार्कमध्ये खेळण्यात आलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी वेस्टइंडिजला 109 धावाने पराभूत करुन दोन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत ठेवली.

पाकिस्ताने विंडीजला विजयासाठी 329 धावांचे लंक्ष्य दिले होते. याच्या प्रत्युतरामध्ये खेळताना यजमान विंडीजचा संघ 219 धावांवर सर्वबाद झाला आणि त्यांना मोठया धावसंख्येने पराभवाचा सामना करावा लागला. विंडीजकडून जॅसन होल्डरने 83 चेंंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 47 धावा केल्या.

पाकिस्तानकडून अफरीदीच्या व्यतिरीक्त नोउमन अलीने तीन आणि हसन अलीने दोन गडी बाद क ेले. पाकिस्तानला या विजयामुळे विश्व कसोटी चॅम्पियनशिपसाठी 12 गुण मिळाले आहेत.

अफरीदीने या सामन्यात आपल्या करीअरमधील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत 94 धावा देऊन एकूण दहा गडी बाद केले. त्याला त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सीरीज पुरस्कार मिळाला.

या आधी पाचव्या दिवशी विंडीजच्या संघाने 49 धावांवर एक गडीच्या नुकसानीसह पुढे खेळण्यास सुरुवात केली. अल्जारी जोसेफ जो एक नाईट वॉचमॅनच्या रुपात 17 धावा करुन खेळत होता. त्याला अफरीदीने बाद करुन यजमान विंडीजला दिवसाचा पहिला झटका दिला. यानंतर नक्रुमाह बोनरला वेगवान गोलंदाज हसनने बाद करुन विंडीजला दुसरा झटका दिला. चौथ्या क्रमाांकवर फलंदाजी करणार्‍या रोस्टन चेजला हसनने बाद करुन आपला दुसरा गडी बाद केला.

क्रीझवर असलेला कर्णधार क्रेग ब-ॅथवेटला साथ देण्यासाठी जर्मेन ब्लॅकवुडनक खेळला पुढे नेत संघाची धावसंख्या तीन अंकीवर पोहचवली. परंतु तो जास्त वेळ टिकू शकला नाही आणि फिरकी गोलंदाज नोउमनने त्याला बाद केले.

कर्णधार ब-ॅथवेट एका बाजूने डावाला संभाळत पुढे घेऊन जात होता परंतु दुस-या बाजूने संघातील एकाही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. ब-ॅथवेटीही जास्त काळ क्रिझवर टिकू शकला नाही आणि नोउमनने तो 39 धावावर असताना बाद केले.

काईल मायेर्स 32 धावावर असताना त्याला अफरीदीने बाद केले व विंडीजला डाव सावरण्याची संधीच दिली नाही. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि पंंचानी चहा पाण्याची  लवकरच घोषणा केली.

टी ब-ेक नंतर क्रीझवर असलेल्या होल्डरला नोउमनने बाद केले यानंतर अफरीदीने केमार रोचला सात धावावर आणि जोशुआ डा सिल्वाला 15 धावांवर बाद करुन पाकिस्तानला विजयाकडे नेले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!