किंग्स्टन कसोटीवर पाकिस्तानची मजबूत पकड, विंडीजवर पराभवाचे ढग
जमैका ,
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात किंग्स्टन येथे खेळवण्यात येत असलेल्या दुसर्या कसोटी सामन्यावर पाहुण्या संघाने मजबूत पकड निर्माण केली आहे. चौथ्या दिवसाअखेर वेस्ट इंडिज संघाने 1 बाद 49 धावा केल्या आहेत. कर्णधार क्रेग ब-ेथवेट (17) आणि नाईट वाचवम अल्झारी जोसेफ 8 धावांवर नाबाद होते. त्याआधी पाकिस्तान संघाने आपला दुसरा डाव 6 बाद 176 धावांवर घोषित केला. वेस्ट इंडिजचा संघ अद्याप 280 धावांनी पिछाडीवर आहे. तर पाकिस्तानला विजयासाठी 9 विकेटची गरज आहे.
चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज संघाने 3 बाद 39 धावांवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली. त्यांच्या संपूर्ण संघ 150 धावांत ऑॅलआउट झाला. वेस्ट इंडिजकडून नक्रमाह बोनर (37), जर्मेन ब्लॅकवूड (33) आणि जेसन होल्डर याने 26 धावा केल्या. तर पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदीने भेदक गोलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने पहिल्या डावात विंडिजचे 6 गडी बाद केले. तर मोहम्मद अब्बासने 3 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.
पाकिस्तानचा संघ दुसर्या डावात फलंदाजीसाठी उतरला. तेव्हा सलामीवीर जोडीने पाकला मजबूत सुरूवात दिली. इमरान बट (37), बाबर आझम (33) आणि आबिद अलीने 29 धावा केल्या. त्यांच्या खेळीनंतर पाकिस्तानने आपला दुसरा डाव 6 बाद 176 धावांवर घोषित केला आणि वेस्ट इंडिज संघाला 329 धावांचे आव्हान मिळाले. विंडिजकडून जेसन होल्डर आणि अल्झरी जोसेफ यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 329 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरूवात खराब झाली. त्यांना 34 धावांवर पहिला धक्का बसला. किरोन पॉवेल 23 धावा काढून बाद झाला. यानंतर नाईट वॉचमन म्हणून मैदानात आलेल्या अल्झारी जोसेफने सावध खेळ करत नाबाद 8 धावा केल्या. तर कर्णधार ब-ेथवेटने दुसरी बाजू पकडून ठेवली. चौथ्या दिवसाअखेर वेस्ट इंडिज संघाने दुसर्या डावात 1 बाद 49 धावा केल्या आहेत.