युएस ओपन टेनिस- बक्षीस रक्कम यंदा कमी

नवी दिल्ली प्रतिनिधी

टेनिसप्रेमीना या महिन्यात 30 ऑॅगस्ट पासून वर्षातील शेवटची ग-ँडस्लॅम स्पर्धा युएस ओपनची मेजवानी लुटता येणार असली तरी अंतिम फेरीत खेळणार्‍या खेळाडूंसाठी मात्र फार चांगली बातमी नाही. 12 सप्टेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे. यंदा पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद मिळविणार्‍या खेळाडूंच्या इनाम रकमेत कपात केली गेली असून 2019 च्या तुलनेत ही इनाम रक्कम 35 टक्के कमी केली गेली आहे. असे असले तरी एकूण इनामी रकमेत मात्र थोडी वाढ झाली आहे.

यंदा प्रेक्षक स्टेडियम मध्ये येऊन स्पर्धेचा आनंद लुटू शकतील. इनाम रक्कम कमी केल्याबद्दल अमेरिकन टेनिस संघटनेने दिलेल्या माहितीनुसार करोना आणि स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना पूर्ण बंदी केली गेली होती आणि त्यामुळे महसूल बुडाला होता. यामुळे इनाम रक्कम कमी करावी लागली आहे. पण एकूण इनाम रक्कम 5 कोटी 75 लाख डॉलर्सवर नेली गेली आहे. गतवर्षी ही रक्कम 5 कोटी 34 लाख डॉलर्स होती. सिंगल्स मध्ये विजेतेपद मिळविणार्‍या खेळाडूला 25 लाख डॉलर्स मिळणार आहेत. गेल्या वेळी ही रक्कम 30 लाख डॉलर्स (साडे अठरा कोटी रुपये) होती. 2012 नंतर ही सर्वात कमी रक्कम आहे. त्यावेळी सिंगल्स साठी 19 लाख डॉलर्स म्हणजे 14 कोटी रुपयाचे इनाम दिले गेले होते

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!