राहुल द्रविड यांच्या देखरेखीत एनसीएमध्ये प्रशिक्षकांना दिलं जातंयं कॉर्पोरेट शिक्षण

मुंबई,

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू, राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए) ने कोचिंग कार्यक्रमाला नवे रुप दिले आहे. यात निवडीदरम्यान, येणारा दबाव आणि इतर बाहेरील मुद्यावर उपाय यासाठी भविष्यातील प्रशिक्षकांना कॉर्पोरेट क्लासचे आयोजन करण्यात येत आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळलेल्या काही मोठ्या खेळाडूंनी बीसीसीआयच्या लेवल दोनच्या या कोचिंग क्लासमध्ये भाग घेतला. यात क्लासमध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल परिक्षांचा समावेश करण्यात आला आहे.

कोचिंगमध्ये अत्याधुनिक बदल ध्यानात ठेवत अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. ज्यात ’कॉर्पोरेट समस्या समाधान’ला स्थान मिळणे ही आश्चर्याची बाब आहे. या अभ्यासक्रमात सहभागी लोकांना मैदानाबाहेर विविध मुद्यांचा निपटारा करण्यासाठी प्रेरित केले जाते. या अभ्यासक्रमात सहभागी प्रथम श्रेणी क्रिकेटरने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, हा अभ्यासक्रम मुंबईचे माजी वेगवान गोलंदाज क्षेमल वैनगानकर यांनी तयार केला आहे. त्यांनी एमबीए केलं आहे. याशिवाय त्यांना कॉर्पोरेटमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. मी अशा प्रकारच्या क्लासमध्ये यापूर्वी कधी भाग घेतलेला नव्हता. पण हे अनोखे आहे. यामुळे माझा दृष्टीकोन व्यापक बनण्यास मदत मिळाली.

अभ्यासक्रमात समस्या आणि त्याचे समाधान शोधण्यासोबत यावर उपाय करण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, हे देखील शिकवण्यात आले. यात कोचिंगमध्ये येणार्‍या विविध समस्याबाबत देखील उल्लेख आहे. याशिवाय यात निवडकर्ता कसा कोचला आपले बोलणे पटवून देण्याचा प्रयत्न करतो, हे देखील सांगण्यात आलं आहे. या अभ्यासक्रमाच्या दरम्यान, राहुल द्रविड यांनी कोणताही तास घेतला नाही. ते एक विद्यार्थी सारखं कोचिंग घेणार्‍यांसोबत बसून होते.

द्रविड यांच्यासोबत प्रथम श्रेणी खेळलेल्या एका माजी खेळाडूने सांगितलं की, आम्हाला खेळाडूंचे व्हिडिओ दाखवले जातात आणि त्यावर समाधान विचारले जाते. तेव्हा राहुल हे आमच्यासोबत जोडले जातात आणि यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. ते सांगतातं की, आजही मी एक स्वत:ला विद्यार्थी सारखं मानतो. ज्या दिवशी शिकणे बंद होईल, तो दिवस या क्षेत्रातील अखेरचा असेल. क्लासमध्ये भाग घेणार्‍यांमध्ये रॉबिन बिष्ट, जकारिया जुफरी, प्रभंजन मलिक, उदय कौल, सागर जोगियामनी, सरबजीत सिंह, अरिंदम दास, सौराशीष लाहिडी, राणादेब बोस, के बी पवन आणि कोनोरे विलियन्स सारखे माजी आणि सद्याचे खेळाडूंचा समावेश आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!