नीरज चोप्रावर येणार बायोपिक; मधुर भांडारकरांनी घेतली भेट

नवी दिल्ली,

मराठमोठा भालाफेकपटू आणि हरियाणाचा लाल नीरज चोप्रा याने सुवर्ण पदक पटकावून इतिहास रचला आहे. यापूर्वी त्याच्यासारखी कामगिरी कुणीच केलेली नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला खास आमंत्रित केले होते. यावेळी त्याला खास चुरमा खायला देण्यात आला होता. त्याने केलेल्या या कामगिरीनंतर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. आता तो भारतातील अबालवुद्धांचा गळ्यातील ताईत झाला आहे. आता त्याच्याबाबत एक नवीन बातमी हाती लागली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनी नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांची भेट घेतली आहे. या दोघांच्या जीवनावर बायोपिक येणार असल्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत.

नीरज चोप्रा ऑॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला भालाफेकपटू ठरला आहे. बि-टिश भारताकडून खेळलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी 1900च्या ऑॅलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये याच कॅटेगरीत दोन पदके जिंकली होती, अशी नोंद सापडते. परंतु ते इंग-ज होते, भारतीय नव्हते. त्यामुळे भारताकडून खेळले असले तरी त्याचे श्रेय भारतीयांना जात नाही. नीरजने भारताची 121 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर तर दुसर्‍या प्रयत्नात 87.58 मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!