’….तर टीम इंडियाला जशास तसं उत्तर देऊ’, इंग्लंडच्या कोचचा गंभीर इशारा
मुंबई,
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसर्या टेस्टच्या दरम्यान दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये मैदानात वाद झाला होता. या वादानंतरही इंग्लंडच्या टीमच्या धोरणात काहीही बदल झालेला नाही. इंग्लंडचे कोच ख्रिस सिल्वरवूड यांनी तिसर्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला गंभीर इशारा दिला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट 25 ऑॅगस्टपासून लीडवर सुरू होणार आहे.
सिल्वरवूडनं मीडियाशी बोलताना सांगितलं की, ’आम्ही लढाईला घाबरत नाही. त्यांनी आम्हाला धक्का दिला तर आम्ही त्याला चोख उत्तर देऊ. ही एक जोरदार टेस्ट झाली. पण, आम्ही निकालामुळे निराश आहोत. या प्रकराची परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर आमच्याकडे योजना असेल. आम्ही आक्रमक धोरण स्वीकरण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यांनी याची सुरुवात केली होती. आम्ही फक्त उत्तर देण्याचा प्रयत्न करत होतो.’ असा दावा ख्रिसवूडनं केला.
काय होता वाद?
लॉर्ड टेस्टच्या पाचव्या दिवशी खेळाच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी जसप्रीत बुमराहवर निशाणा साधला. बुमराहविषयी इंग्लंडच्या खेळाडूंनी अपशब्द वापरल्यानंतर भारतीय खेळाडूही भडकले, यानंतर बुमराह आणि बटलरमध्ये बाचाबाची झाली. अखेर अंपायरना मध्ये पडावं लागलं. बुमराह इंग्लंडच्या खेळाडूंशी पंगा घेत असल्याचं पाहून ड्रेसिंग रूममध्ये असलेला कर्णधार विराट कोहलीही आक्रमक झाला होता.
तिसर्या दिवशी बुमराह आणि जेम्स अँडरसन यांच्यामध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर या वादाला सुरुवात झाली. बुमराहने अँडरसनवर बाऊन्सरचा पाऊस पाडला. यातले काही बॉल अँडरसनच्या शरिरावरही लागले. अखेर मोहम्मद शमीने अँडरसनला बोल्ड केलं. आऊट झाल्यानंतर निराश झालेला अँडरसन भारतीय खेळाडूंना काहीतरी बोलला. यानंतर चौथ्या दिवशीही विराट आणि अँडरसन यांच्यात वाद झाले आणि पाचव्या दिवशीही हा पंगा सुरूच राहिला.