आयपीएल 2021, युएई स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना प्रवेश?

नवी दिल्ली,

करोनाचा धोका निर्माण झाल्यामुळे मधेच थांबविले गेलेले आयपीएल 2021 चे उर्वरित सामने 19 सप्टेंबर पासून युएई येथे खेळविले जाणार असून या सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये येण्याची परवानगी मिळावी यासाठी स्पर्धा आयोजक प्रयत्नशील आहेत. गल्फ न्यूजच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार अमिरात क्रिकेट बोर्डचे महासचिव मुबशीर उस्मानी यांनी त्यांचे बोर्ड बीसीसीआय आणि युएई सरकारशी या संदर्भात बोलणी करत असल्याचे सांगितले आहे.

अमिराती क्रिकेट बोर्ड आयपीएल साठी यजमानाच्या भूमिकेत आहे. बोर्डाला क्रिकेट सामने सुरु असताना स्टेडियम मध्ये प्रेक्षकाना येऊ देणे आवश्यक वाटते असे सांगून उस्मानी म्हणाले, यासाठी आवश्यक प्रोटोकॉल साठी आम्ही परवानगी मागितली आहे. युएई सरकारने स्टेडियमच्या क्षमतेच्या 60 टक्के प्रेक्षक येण्याबाबत सहमती दर्शविली आहे. आता बीसीसीआय बरोबर चर्चा सुरु आहे.

19 सप्टेंबरला मुंबई इंडीयन्स आणि चेन्नई सुपरकिंग याच्यात पहिला सामना होणार आहे. एकूण 27 दिवसात 31 सामने खेळविले जाणार आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!