टोक्यो 2020 पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होणार्या भारतीय चमूशी 17 ऑगस्ट ला पंतप्रधान साधणार दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद.
नवी दिल्ली,
टोक्यो 2020 पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होणार्या भारतीय चमूशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 17 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
देशभरातील 54 खेळाडू 9 विभिन्न क्रीडाप्रकारात पात्र ठरले असून पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी टोक्योला निघणार आहेत . पॅरा ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणारा आतापयर्ंतचा हा भारताचा सर्वात मोठा चमू आहे. या संवादाच्या वेळी केंद्रीय क्रीडामंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.