चाय पे चर्चा : टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंना भेटले राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंसोबत चहापान केला. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे हे चहापान झाले. याची माहिती राष्ट्रपती भवनकडून टिवट करत देण्यात आली. या चहापान कार्यक्रमाला खेळाडूंसोबत टोकियोला गेलेले त्यांचे प्रशिक्षक आणि सहाय्यक स्टापला सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते.

या चहापान कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद बोलताना म्हणाले की, तुम्ही विजयानंतर विनम-ता आणि पराभव संयमाने स्वीकारला, याचा मला आनंद आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, 130 करोड भारतीय तुमच्या यशासाठी प्रार्थना करत होते. ते संपूर्ण उत्साहात तुमचे समर्थन करत होते.

आम्हाला आमच्या मुलींवर खूप अभिमान आहे, ज्यांनी अनेक अडचणींचा सामना करत जागतिक स्तरावर आपली छाप सोडली. कोरोना महामागीत तुम्ही जल्लोष साजरा करण्याची संधी दिली. जेव्हा तुम्ही कोणत्याही खेळात भाग घेता, यात तुम्ही कधी जिंकता तर कधी पराभूत होता. परंतु प्रत्येक वेळी नवी गोष्ट शिकण्यास मिळते, असे देखील रामनाथ कोविंद म्हणाले.

मी अ‍ॅथलिटना टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केल्याबद्दल शुभेच्छा देतो. या संघाने ऑॅलिम्पिक इतिहासात देशासाठी सर्वात जास्त पदक जिंकली आहेत. तुमच्या या कामगिरीवर संपूर्ण देशाला अभिमान असल्याचे देखील कोविंद म्हणाले.

दरम्यान या चहापान कार्यक्रमात लवलिना बोर्गोहेन, बजरंग पुनिया, पी. व्ही. सिंधू, एमसी मेरी कोमसह भारतीय पुरूष हॉकी संघातील खेळाडू सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!