हार्दिक पांड्याचा नवा लुक व्हायरल

नवी दिल्ली,

चेन्नई सुपरकिंग्सचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याचा नवा डॅशिंग लुक गेल्या महिन्यात व्हायरल झाल्यापासून क्रिकेटपटूंनीही त्यापासून प्रेरणा घेतल्याचे दिसून येत आहे. मुंबई इंडीयन्सचा ऑॅलराउंडर, धोनीचा चेला आणि जवळचा मित्र हार्दिक पांड्या यानेही धोनीच्या पावलावर पाउल टाकत अलीम हकीम कडून नवी हेअरस्टाईल करून घेतली आहे. त्याचा हा नवा लुक त्याच्या चाहत्यांना फारच भावला आहे. हार्दिकने स्वत:च त्याचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्रीलंका दौर्‍यात 27 वर्षीय हार्दिकला शेवटचे खेळताना पाहिले गेले आहे. या दौर्‍यात त्याची कामगिरी अगदी निराशाजनक होती. आता तो आयपीएल 2021 चे उर्वरित सामने खेळण्यासाठी युएई ला रवाना होणार आहे. श्रीलंकेहून परतल्यावर आणि युएईला जाण्याच्या अगोदर हार्दिकला वेगळी स्टाईल करायची होती. अर्थात हार्दिकने यापूर्वीही अनेकदा अलीम हकीम कडून वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून घेतल्या आहेत.

हार्दिकची नवी हेअरस्टाईल ‘ ड्रॅपर’ म्हणून ओळखली जाते. पत्नी नताशा हिनेही हार्दिकच्या नव्या स्टाईलची तारीफ केली आहे. मुंबई इंडीयन्सचा आयपीएल दुसर्‍या सत्रातला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स बरोबरच होणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!