देशाचं नाव जगभरात उंचावणार्या ऑॅलिम्पिकवीर प्रवीण जाधवचा असाही संघर्ष!
सातारा,
गरिबी वाईट असते मात्र त्या गरिबीवर मात करत आपलं भवितव्य उजळवणारे ठराविकच असतात. त्यातलाच एक भारतीय खेळाडू म्हणजे तिरंदाज प्रवीण जाधव असं म्हटल्यास वावगं नाही. प्रवीण जाधवच्या कुटुंबाच्या आयुष्यातील संघर्ष म्हणजे सर्वांचे डोळे उघडा लावणाराच. गावाच्या एका कोपर्यात असलेली शेती महामंडळाची जागा, त्या जागेवरची झोपडी. प्रवीणची ऑॅलिम्पिकला निवड झाल्याचे समजल्यानंतर आम्ही त्याच्या फलटण तालुक्यातील सरडे गावात पोचलो. प्रवीणचा घराचा पत्ता विचारत विचारत घरा समोर पोहचलो. घरासमोर आम्ही आमची गाडी लावली. प्रवीणच्या घराकडे बघत असताना आम्हाला त्याच्या संघर्षातील अनेक पैलूंचा आपोआपच उलगडा झाला होता.
आमच्या समोर उभा राहिलेल्या व्यक्तीला आम्ही आबदीन विचारलं, प्रवीणचे आई वडील कुठे आहेत? त्यावेळेला आमच्या समोर उभारलेल्या दाम्पत्यांच्या तोंडून एकच वाक्य निघाले, फआम्हीच कीङ्ग आम्ही जरा थक्क झालो. त्यांच्या सगळ्या राहणीमानाच्या परिस्थितीवरून आम्ही बावरलो होतो. कारण प्रवीणचे आई वडील आणि त्याचं असे घर असेल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने आमचं स्वागत करत बसायला अंगणातच चटई टाकली. आम्ही आमची ओळख सांगितल्यावर प्रविणच्या आईने लगबगीने चूल पेटवायला सुरुवात केली. प्रवीणच्या आईने चुलिवर चहा केला आणि चहाची वाटी आमच्या हातात दिली. पेटलेल्या चुलितला जाळ वाया जाऊ नये म्हणून त्या चुलीवरच तिने तवा टाकून भाकरी थापायला सुरवात केली.
तुम्ही का आला आहात असे आम्हाला विचारल्यावर प्रविणची ऑॅलिम्पिकला निवड झाली आहे ना म्हणून आम्ही तुमची मुलाखत घेणार आहे. आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत असे सांगितले. दोघेही बावरलेली होती. कारण दोघांनी कधीच कॅमेरा पाहिलेला नव्हता. आणि दोघांनी एका सुरात सांगितलं की आम्हाला कॅमेर्यात बोलता येत नाय. आमच शिक्षण नाय आणि आम्ही काय बोलणार. काहीच अडचण नाही असं म्हणून आम्ही त्यांना जबरदस्तीने कॅमेरासमोर बसवलं. हळू बोलत केलं. प्रवीण घडला कसा याचे एकेक पैलू ते सांगताना आम्ही थक्क झालो होतो. पण प्रवीणच्या आई-वडिलांचा जो काही संघर्ष होता तो सांगत असताना त्या दोघांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. तर जेव्हा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न आई सांगत होती तेव्हा तर प्रविणची आई कॅमेरा समोरच ढसाढसा रडायला लागली. पोटाला चिमटा काढून कसे दिवस काढले त्याचे अनेक पैलू त्यांनी आम्हाला सांगितले. मुलाखात संपवेपर्यंत मी सुन्न झालो होतो. सुन्न अवस्थेत त्यांना नमस्कार करून आम्ही तुम्हाला भेटायला पुन्हा नक्की येणार अस सांगून आम्ही तेथून निघुल आलो. दिवसभर आम्ही या कुटुंबाच्याच विचारात होतो.
ऑॅलिम्पिक दुसर्या कसोटीपर्यंत प्रविण जिद्दिने खेळला. दुसर्या राऊंडला तो बाहेर पडला मात्र त्याच्या या संघर्षाच संपूर्ण भारत देशभरात कौतुक केल जात होत.
प्रवीण गावी आल्याचं समजल्यानंतर आम्ही त्याला भेटण्यासाठी त्याची मुलाखत घेण्यासाठी त्याच्या पुन्हा सरडे गावात गेलो. जाण्याअगोदर आम्ही सकाळी सात वाजता घरी येत आहोत, असा निरोप पोहचवला होता. घरासमोरच्या अंगणात प्रविणचे वडील झाडलोट करत होती. त्याची आई चुलीवर पाणी तापत होती. फप्रवीण झोपला आहे आजून. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे तो सकाळी उठला नाही फ असं त्याच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं. आम्ही त्याला उठवायला सांगितलं. त्याला वडिलांनी तिथूनच हाका मारायला सुरुवात केली. वडिलांसोबत तिकडच्या गप्पा मारायला आम्ही सुरुवात करत असताना त्यांनी आम्हाला शासनाने आम्हाला कुठे बांधायला लावलेला आहे हे आम्हाला ते सांगत होते. हे सांगत असताना मात्र माझ लक्ष प्रवीणच्या आईवर गेलं. त्याचं कारणही तसंच होतं. ती बिचारी माळरानावरून गोळा केलेल्या लाकडाला चुलीत लाकड घालून पेटवत होती.
कदाचित ती लाकड ओळी असतील म्हणून जरा कुठे जाळ धरला की जाळ विझून पुन्हा धूर निघत होता. अन् ती माउली त्या धुराला बाजूला सारत पुन्हा लाकड पेटवण्यासाठी फुंकनीतून हवा घालत पुन्हा पेटवत होती. बरं हा चुलीवरचा हा सगळा प्रकार कुठे सुरू होता तर ज्या ठिकाणी प्रविणच्या कौतुकाचा भला मोठा फलक लावला होता त्याच्या अगदी समोरच. एका बाजूला गावात आलेल्या प्रवीण तोंड भरून सर्वांकडून कौतुक केले जात होतं. तर दुसरीकडे त्याच खेळाडूच्या आईचा संघर्ष ती ओली लाकड पेटवण्याचा. हा त्या माऊलीचा चाललेला संघर्ष म्हणजे अंगावर शहारे आणणाराच होता. माझे डोळे कॅमेरामनला शोधण्याचा प्रयत्न होते. मात्र, माझ्या नजरेच्या टप्यात कॅमेरामन दिसत नव्हता. मन सुन्न करायला लावणार हा क्षण खूपच महत्वाचा असल्यामुळे मी माझ्या खिशातील मोबाईल बाहेर काढला आणि हा सगळा नजारा माझ्या मोबाईल मध्ये घेतला. तिरंदाज प्रविणच्या आईला आजही अशा पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करावा लागतो आणि हा खरा संघर्ष सगळ्यांना प्रेरणा देणारा होता. कदाचित भविष्यात प्रवीण जाधव यांच्या आयुष्यातला हा संघर्ष प्रविण कायमचा दुर करेल मात्र सध्यातरी हा संघर्ष आजही सुरू आहे.
प्रवीण जाधवचे आजोबा शेती महामंडळात होते. शेती महामंडळाकडून आपल्याला जागा मिळेल या प्रतीक्षेत प्रवीण जाधवचे वडील आणि प्रवीण जाधव आजपर्यंत होते. मात्र, प्रविणच्या अनाधिकृत घर बांधण्याच्या कारणातून गावातील लोकांसोबत वाद पेटला आणि महसूल विभागाने या शेती महामंडळाच्या जागेतील तीन गुंठ्याची जमीन प्रविणच्या कुटुंबाला सध्या देण्याचं ठाणल आहे. हे सध्यातरी कागदावरच आहे. प्रत्यक्षात हे कधी उतरेल माहिती नाही.