हॉकी खेळाडू विवेक सागरवर शुभेच्छांचा वर्षाव

भोपाळ,

टोकिओ ऑलम्पिकमध्ये कास्य पदक जिंकणारा भारतीय हॉकी संघाचा सदस्य राहिलेला मध्य प्रदेशचा विवेक सागरवर राज्य सरकारने शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याला एक कोटीचा धनादेश देण्यासह मनमाफीक शहरात घर आणि उप-पोलिस अधीक्षकाची नोकरी देण्याची सरकारने घोषणा केली. इंटरनॅशनल यूथ-डे वर आज (गुरुवार) मिंटो हॉल सभागृहात मध्यप्रदेशचे टेाकिओ ऑलम्पिक- 2020 चा पदक विजेता आणि स्पर्धकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की प्रदेश सरकार ऑलम्पिक हॉकी खेळाडू विवेक सागरच्या नातेवाईकांना पक्के घर देईल. त्याच्या कुंटुबाला जे शहर किंवा गावात घर हवे असेल, तेथे उपलब्ध केले जाईल. तसेच एक कोटी रुपयाचा सन्मान निधीचा धनादेश प्रदान करून मध्यप्रदेश शासनात डी.एस.पी. (उप पोलिस अधीक्षक) चे पद देण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या खेळांडूना प्रोत्साहित केले. ते आमची प्रेरणा आहेत. राज्यांना या दिशेत रूची घेऊन खेळांडूना आवश्यक सुविधा देणे आहे, ज्याने ते स्वर्णिम इतिहास रचू शकतील. टोकिओ ऑलम्पिकमध्ये भारताला हॉकीमध्ये कास्य पदक मिळाले नव्हे तर हे हॉकीचे पुनर्जागरण आहे.

मुख्यमंत्री चौहान यांनी अंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू विवेक सागरला शाल आणि सन्मान निधी देऊन सन्मानित केले. तसेच सहाय्यक प्रशिक्षक शिवेन्द्र सिंह यांना 25 लाख रुपयाचा सन्मान निधी देण्याची घोषणा केली.

चौहान यांनी सांगितले की आज आम्ही हॉकीमध्ये जगासमोर आपल्या श्रेष्ठतेचा पुरावा दिला आहे. महिला हॉकीमध्ये भारताचे भविष्य उज्जवल आहे. ऑलम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघ चौथ्या नंबरवर राहिले. तो अंतिम सामना हारला आवश्य परंतु चांगल्या खेळ प्रदर्शनाने पूर्ण देशाचे मन जिंकले. मध्यप्रदेश सरकार महिला हॉकी संघाच्या प्रत्येक खेळाडूला 31-31 लाख रुपये देऊन सन्मानित केले जाईल.

क्रीडा मंत्री यशोधरा राजे सिंधिया यांनी सांगितले की आम्ही अनेक वर्षापासून ऑलम्पिकच्या द्वारवर पदक प्राप्तीसाठी संकेत देत होते. विवेक सागरने हे द्वार उघडले आहे.

खासदार आणि मध्यप्रदेश ऑलम्पिक संघाचे उपाध्यक्ष वी. डी. शर्मा यांनी सांगितले की मध्यप्रदेशात 18 खेळ अ‍ॅकडमी आहे. खेळाच्या उन्नयनसाठी सर्व पाऊल उचलले गेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांनी खेळांडूची हिम्मत वाढवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!