’गोल्डन बॉय’ नीरज चोप्राचा क्रमवारीत डंका, गाठलं थेट ’हे’ स्थान
मुंबई प्रतिनिधी,
टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्ण पदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राची क्रमवारी सुधारली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, नीरज 14 स्थानाच्या सुधारणेसह थेट दुसर्या स्थानावर पोहोचला आहे. नीरजने ऑॅलिम्पिकच्या अंतिम फेरीत 87.58 मीटर लांब भाला फेकत ट्रॅक अँड फिल्डमध्ये देशाला पहिलं पदक जिंकून दिलं. नीरज भारताकडून ऑॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा दुसरा खेळाडू आहे. सुवर्ण पदक जिंकून मायदेशी परतल्यानंतर नीरज चोप्राचे जंगी स्वागत करण्यात आले. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नीरजचा सन्मान केला.
क्रमवारीत नीरज चोप्राच्या आधी टॉप 1 वर जर्मनीचा भालाफेकपटू जोहानेस वेटर आहे. त्याच्या खात्यात 1392 गुण आहेत. तर दुसर्या स्थानावर नीरज चोप्राने मुसंडी मारली असून त्याचे 1315 गुण आहेत.
दरम्यान, भारतीय खेळाडूनी टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली. या ऑॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 7 पदके जिंकली. यात एक सुवर्ण पदक, दोन रौप्य पदक आणि चार कास्य पदकाचा समावेश आहे. आतापर्यंत ऑॅलिम्पिकमध्ये भारताची ही सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. 2012 लंडन ऑॅलिम्पिकमध्ये भारताने 6 पदकं जिंकली होती.
टोकियो ऑॅलिम्पिकआधी 23 वर्षीय नीरज चोप्राचे इन्स्टाग-ामवर 143,000 फॉलोअर्स होते. पण टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर नीरजच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली. त्याचे 3.2 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. नीरज जगात सर्वात जास्त फॉलोअर्स असलेला ट्रॅक अँड फिल्डमधील अॅथलिट ठरला आहे.