इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध होणार असल्याचे ईसीबीकडून संकेत
लंडन,
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) ने संकेत दिले की इंग्लिंश खेळाडू आयपीएल 2021 च्या दुसर्या टप्प्यातील स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकतात. ईसीबी याच बरोेबर क्रिकेट ऑस्ट्रेलिया बरोेबर क्रिकटरांना अॅशेज मालिकेच्या दरम्यान आपल्या कुटुंबाला बरोबर ठेवण्या बाबत चर्चा करण्याची आशा करत आहे.
ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टॉम हॅरिसननी म्हटले की आयपीएलच्या सन्मानाला पाहता आम्ही आपल्या खेळांडू बरोबर चर्चा करत आहोत. बांगलादेशाचा दौरा स्थगित झाल्याने खेळाडूंना आयपीएलमध्ये उपलब्ध होण्याची संधी असेल.
ते म्हणाले की खेळाडूंना आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्या शेडयूलला मॅनेज करावे लागू शकते आहे. या चर्चा सुरु आहेत परंतु कोणताही निर्णय हा खेळाडूंशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल.
इंग्लंड संघाला तीन एकदिवशीय आणि तीन टि-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये बांगलादेशाचा दौरा करायचा होता परंतु आता मार्च 2023 पर्यंत याला स्थगित केले गेले आहे. यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.