विराट कोहलीला मागे टाकत जो रुट अव्वलस्थानी; जसप्रीत बुमराहला टॉप 10 मध्ये स्थान
मुंबई प्रतिनिधी,
भारताविरुद्ध नॉटिंघमच्या ट्रेंट बि-ज येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये 173 धावा करणार्या जो रुटने आयसीसी क्रमवारीत आपले टॉप टेन मधील स्थान कायम ठेवलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्रमावारीत मागे टाकले आहे. या यादीत जो रुट चौथ्या क्रमांकावर असून विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजांच्या यादीत इंग्लंड विरुद्ध ट्रेंट बि-ज येथे पहिल्या कसोटी सामन्यात 9 विकेट घेणार्या जसप्रीत बुमराहला फायदा झाला आहे. जसप्रीत बुमराह टेस्ट गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेन मध्ये स्थान मिळवले आहे. जसप्रीत बुमराह नवव्या स्थानावर आहे.
तसेच ऑॅस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मालिकेत गोलंदाडी आणि फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या बांगलादेशचा शाकिब अल अल हसन टी 20 इंटरनॅशनलमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट ऑॅलराऊंडर खेळाडू आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर ऑॅस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ आणि मार्नस लाबुशेन अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या स्थानावर आहे. तर जो रुट चौथ्या आणि कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.
भारताच ऑॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विन गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसर्या स्थानावर आहे. तर ऑॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदांज कमिन्सने पहिले स्थान कायम ठेवलं आहे. त्यानंतर तिसर्या क्रमांकावर न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साउथी आणि चौथ्या स्थानावर ऑॅस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड आहे. भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात गोलांदाजीमध्ये चांगली कामगिरी करणार्या जेम्स अॅन्डरसनला याचा फायदा झाला आहे. जेम्स सातव्या क्रमांकावर तर स्टुअर्ड ब-ॉड आठव्या स्थानी आहे.