पाकिस्तान संघ सतत मोठा आव्हान राहिला आहे – सिमंस

किंग्स्टन,

पाकिस्तानचा क्रिकेट संघ आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आमच्या संघाला मोठे आव्हान देऊ शकतो. तर या वर्षाच्या सुरुवातीला ज्यावेळी दक्षिण अफ्रिकेने आमच्या देशाचा दौरा केला होता त्यामध्येही त्यांनी मोठे आव्हान दिले होते यामुळे आम्हांला मालिकेला गमवावे लागले  असे मत वेस्टइंडिजचा मुख्य प्रशिक्षक फिल सिमंसने व्यक्त केले.

वेस्टइंडिज व पाकिस्तानमध्ये किंग्स्टनमध्ये पहिला कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट पर्यंत खेळला जाईल तर दुसरा सामना 20 ते 24 ऑगस्ट पर्यंत खेळला जाईल.

सिमंसने म्हटले की या मालिकेत आमचा संघ अंडरडॉग असेल आणि ऐवढेच नाही तर कॅरिबियनमध्ये पाकिस्तान ज्यावेळी खेळला आहे त्यावेळी त्यांनी आम्हांला कठोर टक्कर दिली आहे.

ईएसपीएनक्रिकइंफोशी बोलताना सिमंसने म्हटले की ते आपल्या मागील दोन कसोटी मालिकेत खूप चांगले खेळले आहेत आणि उच्चस्तरावर राहिले आहेत. आम्ही दक्षिण अफ्रिके विरुध्द आपल्या मागील मालिकेत इतके चांगले खेळलो नाहीत. यामुळे हे कठिण होणारे आहे. मला वाटते की भले ही आम्ही आपल्या घरात कमजोर आहोत परंतु आम्ही मालिकेत पूर्ण मेहनतीने खेळणार आहोत व हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करुत की या मालिकेला आम्ही जिंंकूत. मागील वेळी 2017 मध्ये ज्यावेळी पाकिस्तानचा संघ येथे खेळला होता त्यावेळी त्यांनी 2-1 ने मालिका जिंकली होती.

सिमंसने पुढे म्हटले की ही एक नवीन मालिका असून यामध्ये आम्ही चांंगली सुरुवात करु इच्छित आहोत. आम्हांला माहिती आहे की आमच्या फलंदाजीत सुधार करण्याची गरज आहे. परंतु आमच्या फलंदाजाचा प्रत्येक डावात आम्ही 400 धावां करावा हाच प्रयत्न असेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!