टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना बीसीसीआयकडून मोठं बक्षिस
टोकियो
8 ऑगस्ट
शनिवारचा दिवस भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवला गेला. नीरज चोप्रा याने अॅथलेटिक्समध्ये भारताच्या झोळीत सुवर्ण पदक घालत इतिहास रचला. यासह टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये भारतीय पदकाची संख्या 7 इतकी झाली. टोकियोत पदक जिंकणार्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने मोठी घोषणा केली.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टिवट करत घोषणा केली. यात ते म्हणतात, सुवर्ण पदक जिंकणार्याला 1 कोटी, रौप्य जिंकणार्याला 50 लाख आणि कास्य पदक जिंकणार्या खेळाडूला 25 लाख रुपये याशिवाय पुरूष हॉकी संघाला 1.25 करोड रुपयांचे बक्षिस देणार आहोत.
बीसीसीआयच्या घोषणेनुसार, नीरज चोप्रा याला 1 करोड, मीराबाई चानू आणि रवी कुमार दहिया यांना प्रत्येकी 50-50 लाख आणि पी. व्ही. सिंधू, लवलिना बोर्गोहेन, बजरंग पुनिया यांना प्रत्येकी 25-25 लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय भारतीय पुरूष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑॅलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलं आहे. यामुळे त्यांना 1.25 करोड बीसीसीआय देणार आहे.
बीसीसीआय शिवाय आयपीएलचा संघ चेन्नई सुपर किंग्जने नीरज चोप्रासाठी 1 करोड रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. नीरज चोप्राने टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये 87.58 मीटर लांब भाला फेकला होता. यामुळे चेन्नई नीरज चोप्राच्या सन्मानासाठी 8758 नंबरची खास जर्सी तयार करणार आहे.