जेम्स अँडरसनचा विश्वविक्रम, कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज, कुंबळेचाही विक्रम मोडला

नवी दिल्ली प्रतिनिधी

8 ऑगस्ट

इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहम मध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजयासाठी 157 धावांची गरज आहे. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा विक्रम मोडीत काढला आहे. कसोटीत 620 विकेटस घेत त्यानं कसोटीत सर्वाधित विकेटस घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. त्याने अनिल कुंबळेच्या 619 विकेटसच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

डरसनच्या नावावर आता 162 कसोटी सामन्यात 620 विकेटसची नोंद झाली आहे. अनिल कुंबळेने 132 कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी 619 विकेटस घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटसश्रीलंकन मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहेत. मुरलीधरनने 133 सामन्यात 800 कसोटी विकेटसची नोंद केली आहेत. त्यानंतर या यादीत ऑॅस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नचा क्रमांक लागतो. वॉर्नने 145 सामन्यात दुसर्‍या सर्वाधिक 708 विकेटस घेतल्या आहेत.

अँडरसन हा जगातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज देखील ठरला आहे. अँडरसनपूर्वी ऑॅस्ट्रेलियन ग्लेन मॅकग-ानं टेस्ट क्रिकेटमध्ये 563 विकेटस घेतल्या आहेत. आता तो सर्वाधिक विकेटस घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजयासाठी 157 धावांची गरज आहे. टीम इंडियाकडे 9 विकेटस शिल्लक असून केएल राहुल मात्र काल चौथ्या दिवशी बाद झाला. नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांवर संपुष्टात आला. भारताने आपल्या दुसर्‍या डावात 1 बाद 52 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात चांगली खेळी करणार्‍या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब-ॉडने बाद केले. चौथ्या दिवसअखेर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी 12 धावांवर खेळत आहेत. अद्याप टीम इंडियाला विजयासाठी 157 धावांची गरज आहे.

दुसर्‍या डावात कर्णधार रुटचे शानदार शतक

इंग्लंडने कर्णधार जो रुटच्या शतकाच्या बळावर दुसर्‍या डावात आव्हानात्मक धावसंख्या उभारली. तिसर्‍या दिवसअखेर बिनबाद 25 धावांवरून पुढे खेळणार्‍या इंग्लंडचा डाव चौथ्या दिवशी 303 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून जो रुटने 109 धावा केल्या. जो रुटला जॉनी बेअरस्टोने 30 आणि त्यानंतर सॅम करनने 32 धावा करत चांगली साथ दिली. भारताकडून पहिल्या डाव चार विकेटस घेणार्‍या बुमराहने दुसर्‍या डावात 5 विकेटस घेतल्या तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

पहिल्या डावात लोकेश राहुलची चांगली खेळी

पहिल्या डावात इंग्लंडला भारताने 183 धावांवर गुंडाळले होते. कर्णधार रुटच्या अर्धशतकाशिवाय कुणीही मोठी खेळी करु शकलं नाही. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूरच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ 183 धावांवर आटोपला. इंग्लंडचा डाव 183 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी 97 धावांची दमदार सलामी दिली होती. मात्र त्यानंतर राहुल आणि जाडेजा वगळता टीम इंडियाकडूनही कुणाला मोठी खेळी करता आली नाही. जाडेजाने 8 चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी खेळी केली. त्यानंतर आलेल्या जसप्रीत बुमराहने फटकेबाजी करत 28 धावा केल्या. त्यामुळं भारताचा पहिला डाव 278 धावांवर गुंडाळला. भारताकडून राहुलनं 84, जाडेजानं 56 धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात रॉबिन्सननं 5 तर अँडरसननं 4 विकेटस घेतल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!