शाकिब आणि मार्श आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी नामंकित
दुबई प्रतिनिधी
8 ऑगस्ट
अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) आज (रविवार) जुलै महिन्याचे प्लेयर ऑफ द मंथ साठी बांग्लादेशचा शाकिब अल हसन, ऑस्ट्रेलियाचा मिशेल मार्श आणि वेस्टइंडीजचे हेडन वाल्श जूनियरला नामंकित केले आहे. महिला वर्गासाठी आयसीसीने विंडीजची हेली मॅथ्यूज, पाकिस्तानची फातिमा सना आणि विंडीजच्या स्टेफानी टेलरचे नाव नामंकित केले आहे.
शाकिबने मागील महिन्यात झिम्बॉब्वेविरूद्ध बांग्लादेशला मलिका जिंकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. मार्शने विंडीजविरूद्ध तीन एकदिवसीय आणि पाच सामन्याची टी20 मालिका खेळली होती. त्याने टी20 मध्ये 219 धावा बनवल्या आणि आठ गडी बाद केले होते.
लेग स्पिनर हेडनने मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले जेते त्याने सात गडी बाद केले. टी20 मालिकेत त्याने पाच सामन्यात 12 गडी बाद केले.
हेलीने पाकिस्तानविरूद्ध शतक जडले आणि दोन गडी बाद केले. हेलीला पाकिस्तानविरूद्ध मालिकेदरम्यान मालिकावीर निवडले गेले.
फातिमा पाकिस्तानविरूद्ध मालिकेदरम्यान सर्वाधिक गडी बाद करणारी गोलंदाज होती जेव्हा की कर्णधार स्टेफानीने पाकिस्तानविरूद्ध एकदिवसीय आणि टी20 मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीने संघाला विजय देण्यात योगदान निभावले.