नीरजला जर्मन विशेषतज्ञ बारटोनिएट्ज बरोबर प्रशिक्षीत करण्याचा एएफआयचा निर्णय लाभदायक राहिला
नवी दिल्ली प्रतिनिधी
8ऑगस्ट
भारतीय अॅथलेटिक्स महासंघ चा भाला फेक अॅथलीट नीरज चोपडाला जर्मन प्रशिक्षक क्लाउस बारटोनिएटज बरोबर प्रशिक्षण देण्याचा निर्णय लाभदायक राहिला आहे. त्यांने नीरजला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.
एएफआयने रविवारी टिवीट करुन म्हटले की नीरजला नवीन ऑलिम्पिक चॅम्पियन बनविण्यासाठी धन्यवाद किंग क्लाऊस.
या उत्तरामध्ये क्लाउसने म्हटले की मला नीरजसाठी खूप आनंदाची अनुभूति होत आहे की त्यांने कांस्य नाही तर सुवर्ण जिंकले आहे. तो जगातील सर्वश्रेष्ठ भालाफेक अॅथलीट आहे.
नोव्हेंबर 2019 मध्ये एएफआयने टोकियो 2020 ला लक्षात घेता दक्षिण अफ्रिकेमध्ये झलेल्या अॅथलेटिक्स सेंट्रल नॉर्थ ईस्ट मीटिंगच्या आधी क्लाउसला नीरजचा प्रशिक्षक बनविले होते.
नीरजने हाताच्या कोपर्याच्या जखमेतून सावरल्यानंतर सर्किटमध्ये उत्कृष्टपणे वापसी केली होती आणि दक्षिण अफ्रिकेत 87.86 मीटरचा थ-ो करुन टोकियोसाठी प्रवेशपात्रता मिळविली होती.