इंग्लंडमधल्या पावसाने टीम इंडियाचं स्वप्न भंगलं, पहिली टेस्ट ड्रॉ
नॉटिंघम
8 ऑगस्ट
भारत आणि इंग्लंड यांच्यातली पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाली आहे. पाचव्या दिवशी पावसामुळे एकही बॉल टाकला गेला नाही, त्यामुळे पहिली टेस्ट जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं आहे. मॅचच्या अखेरच्या म्हणजेच पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी 157 रनची गरज होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 521 झाला होता. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी 12 रनवर खेळत होते. केएल राहुलच्या रुपात भारताला चौथ्या दिवशी एकमेव धक्का बसला. स्टुअर्ट ब-ॉडने 26 रनवर राहुलची विकेट घेतली.
चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडला 303 रनवर ऑॅल आऊट केलं. पहिल्या इनिंगमध्ये 95 रनची आघाडी घेतल्यामुळे भारताला विजयासाठी 209 रनचं आव्हान मिळालं आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताला बॅटिंगची संधी मिळाली तेव्हा बॉल स्विंग होत असतानाही 3.71 च्या रन रेटने आक्रमक बॅटिंग केली. 14 ओव्हरच्या खेळात भारताने 9 फोर मारल्या.
भारताकडून या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल यांनी चमकदार कामगिरी केली. टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्या केएल राहुलने पहिल्या इनिंगमध्ये 84 रन केले, तसंच दुसर्या इनिंगमध्येही तो फॉर्ममध्ये दिसला. तर जसप्रीत बुमराहने पहिल्या इनिंगमध्ये 4 आणि दुसर्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून ओली रॉबिनसनने पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट मिळवल्या. जेम्स अंडरसन याने या सामन्यात अनिल कुंबळेच्या 619 टेस्ट विकेटचा विक्रम मोडीत काढला. यासह अंडरसन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्या बॉलरच्या यादीत तिसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. अंडरसन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फास्ट बॉलर आहे. याशिवाय इंग्लंडचा कर्णधार जो रूट (गेश ठेेीं) यानेही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक करणार्या रूटने दुसर्या इनिंगमध्ये शतकी खेळी करून इंग्लंडला वाचवलं.